Subscribe Us

header ads

नाळवंडी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम ठार


प्रतिनिधी नवनाथ गोरे
🔶🔷🔶🔷🔶🔷

बीड_बीड तालुक्यातील नाळवंडी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम जागीच ठार झाल्याची घटना आज नाळवंडी येथे घडली आहे. आश्रुबा मोकाजी जाधव (वय ५०) वर्ष हे गावातून रोड ने पाई चालत जात असताना नाळवंडी येथील पुलावर अज्ञात ट्रॅक्टर ने त्यांना जोराची धडक दिली धडकेत  आश्रुबा जाधव हे खाली पडले असता ट्रॅक्टर त्यांच्या अंगावरून गेले त्यात त्यांचा जागीच मृत्यू  झाल्याची दुर्दैवी घटना आज नाळवंडी येथे घडली आहे.घटनेची माहिती पिंपळनेर पोलीस ठाण्यात कळली असतात लगेच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पो नि सोनवणे साहेब हे घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड येथील सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आला आहे पुढील तपास पिंपळनेर पोलीस ठाण्याचे  पो नि सोनवणे साहेब हे करत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा