Subscribe Us

header ads

शाहरुख खानने भाजपमध्ये प्रवेश केल्यास ड्रग्जचे रुपांतर साखरेत होईल---- राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ

बीड स्पीड न्यूज 

मुंबई_अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यातील राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी आर्यनच्य अटकेप्रकरणी एनसीबी आणि अधिकाऱ्यांवर आरोप केले. त्यानंतर आता मंत्री छगन भुजबळ यांनी याचं प्रकरणावरून भाजपाला टोला लगावला आहे. अभिनेता शाहरुख खानने भाजपामध्ये प्रवेश केल्यास ड्रग्जचे रुपांतर साखरेत होईल, असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय.राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ पक्षातर्फे आयोजित एका कार्यक्रमात म्हणाले, की गुजरातमधील मुंद्रा बंदरातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचं वृत्त आहे. मात्र या प्रकरणाचा तपास करण्याऐवजी एनसीबी शाहरुख खानच्या मागे लागली आहे. शाहरुख खानने भाजपामध्ये केल्यास ड्रग्जचे साखरेत रूपांतर होईल. दरम्यान, २ ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवरील पार्टीदरम्यान एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेतले होते. आर्यन खान आणि त्याच्या मित्रांना अंमली पदार्थ बाळगणे, सेवन, खरेदी आणि तस्करी या प्रकरणी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून आर्यनसह त्याचे मित्र तुरुंगात असून त्यांना जामीन देण्यात आलेला नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा