Subscribe Us

header ads

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत बीड येथे महाशिबीर थेट दुर्गम व खेडयातील नागरिकांच्या न्याय व हक्कांबाबत जागरुकता आणण्यासाठी विधी सेवा महाशिबीरातून कार्य --सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांचे प्रतिपादन

बीड स्पीड न्यूज 

महाशिबीराचे भव्य समारंभात उद्घाटन, लाभार्थींना लाभ, धनादेश व प्रमाणपत्र वितरण


बीड, दि. 23 (जि.मा.का.) :-   आर्थिक व सामाजिक निर्बंधांमुळे  बाजू मांडता येत नसेल अशांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण काम करत आहे. थेट दुर्गम व खेडयातील नागरिकांपर्यंत पोहचवून त्यांच्या न्याय व हक्कांबाबत माहिती मिळावी. त्यांना मदतीचा हात देता यावा, यासाठी विधी सेवा  महाशिबीराच्या पॅन इंडिया अवेअरनेस कॅम्पेनमधूनन कार्य करण्यात येत आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांनी आज केले.बीड येथे आज विधी सेवा  महाशिबीराचे (मेगा लिगल स‍र्व्हिस कॅम्प) उद्घाटन समारंभात ते बोलत होते. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई याच्या सहकार्याने तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शासकिय विभाग, समाजसेवी संस्था यांच्या सहकार्याने महाशिबीराचे आयोजन करण्यात आले होते.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्य महात्मा गांधी यांच्या जयंती 2 आक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत पॅन इंडिया लिगल अवेरनेस ॲण्ड आऊटरिच कॅम्पेनचे देशभरात आयोजन करण्यात आले आहे.   या अंतर्गत बीड येथे आज हा कार्यक्रम संपन्न झाला.

उदघाटन समारंभाच्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती  ए ए सय्यद, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस एस शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती श्रीमती  व्ही. व्ही. कांकणवाडी, राष्ट्रीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण  समितीचे सदस्य सचिव अशोक जैन, राज्य विधी सेवा प्राधिकरण  समितीचे  सदस्य सचिव डी पी सुराणा,  जिल्हा न्यायाधीश हेमंत महाजन, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, महाराष्ट्र गोवा बार असोशिएशनचे सदस्य वसंतराव साळुंखे, बीड वकिल संघाचे अध्यक्ष ॲड. एस.के. राऊत, न्या. सिद्धार्थ गोडबोले आणि असंख्य शासकिय योजनांचे लाभार्थी, विविध  विभागांचे अधिकारी- कर्मचारी आणि नागरिक मोठया संख्येने  उपस्थित होते.

सदर महशिबीरात विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांचे एकुण 50 स्टॉल्स सदर योजनांचा लाभ देण्यासाठी उभारण्यात आले होते.  सुरुवातीस न्या. ललीत यांनी फित कापून शिबीराचे उदघाटन केले व सर्व स्टॉल्सची भेअ देऊन पाहणी केली. तसेच योजना आणि तेथून नागरीकांना देण्यात येणाऱ्या लाभांबाबत माहिती जाणून घेतली.  त्यांच्या हस्ते लाभार्थींना यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात लाभाचे धनादेश, प्रमाणपत्रे, ट्रॅक्टर्स, शिलाई मशीन्स, विविध साहित्य यांचे सन्मानपूर्वक वितरण करण्यात आले. यामध्ये कोविड काळात जीव गमावलेल्या जिल्हा रुग्णालयातील परिचरिकेच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांचा धनादेश तर दोन्ही पालक गमावलेल्या मुलास 5 लक्ष रुपयांचा धनादेशाचे देखील वितरण करण्यात आले.

महाशिबीराच्या समारंभास मोठया संख्येने उपस्थित जनसमुदायास यावेळी श्री ललित यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, प्रत्येक  नागरिकाला त्याचे हक्कांची जाणीव करून देणे आणि त्याचे लाभ त्याला मिळवून देणे गरजेचे आहे, ते अज्ञानामुळे अथवा त्यांच्या दुर्बलतेमुळे न्यायालयीन प्रविष्ट बाबीमध्ये अडकून राहत आहेत. महाशिबीरातून या सर्व योजनेचे प्रदर्शन भरवून आपले हक्क, जाणीव याची गरजूंना माहीती करून दिली जाणे हा उददेश तर आहेच पण फक्त 45 दिवसच हा उपक्रम सुरू न राहता सदैव यावर मंथन व्हावे. शेवटच्या माणसास न्याय मिळाला तरच आपल्या या यंत्रणेचं फलित म्हणावे लागेल. याच बरोबर आझादी का अमृत महोत्सव खर्या अर्थाने आपण साजरा करू शकणार आहोत. हे एक मोठे अमर्याद  काम असून सर्व जन  सुखी व्हावे कुणाला दु:ख नसावे यासाठी काम करावे लागेल असे विचार व्यक्त केले. 

 

या प्रसंगी न्यायमूर्ती एस एस शिंदे यांनी स्वागतपर प्रास्तविक करताना आपले मार्गदर्र्शन केले. पॅन इंडिया लिगल अवेरनेस ॲण्ड आऊटरिच कॅम्पेन देशाचे सरन्यायाधिश एन. व्ही. रमना यांच्या हस्ते नवी  दिल्ली  येथे शुभारंभाने सुरु झाले आहे. गरजूंसाठी विधी सेवा प्राधिकरण दवारे मोफत कार्यवाही केली जात आहे.ही माहिती पोहोचवण्यासाठी या कालावधी शिबीरे, प्रदर्शने, मोबाईल व्हॅन आदीच्या माध्यमातून जनजागृती केली जात असल्याचे त्यांनी  सांगितले.त्यानंतर न्यायमूर्ती ए ए सय्यद यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यांनी  सांगितले काही ग्रामीण, दुर्गम भागात अजून  सुध्दा शिक्षण, वीज, चांगले रस्ते अशा पायाभूत सुविधा पोहोचल्या नाहीत. विकासाचा लाभ सगळ्यांपर्यत पाहोचावा यासाठी सतत प्रयत्न करावे लागतील. यावर न्या. सय्यद यांनी भर दिला.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. हेमंत महाजन यांनी केले. त्यांनी महाशिबीराच्या यशस्वीतेसाठी योगदान दिलेल्या प्रशासनाचे विभाग, संस्था, व्यक्ती आदींचे आभार मानले.बीड यथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळया जवळील छत्रपती संभाजी महाराज क्रिडा संकुल (जुने मल्टीपर्पज ग्राउड) येथे हा समारंभ झाला. दिपप्रज्ज्वलना नंतर धुतेकर विद्यालयाच्या चमुने गीताने प्रमुख पाहुण्याचे स्वागत केले. प्रमुख्‍ पाहुणे आणि मान्यवर यांचा जिल्हा न्यायालय , जिल्हा वकिल  संघ आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा