Subscribe Us

header ads

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण, पण देशात पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरुच

बीड स्पीड न्यूज 

मुंबई_गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुरु असलेल्या खनिज तेलाच्या दरवाढीला अखेर ब्रेक लागला आहे. रॉयटर्सच्या माहितीनुसार, कोळसा आणि नैसर्गिक वायूच्या दरातही घसरण नोंदवण्यात आली आहे. खनिज तेलाचा दर प्रतिबॅरल 86 डॉलर्सपर्यंत पोहोचला होता. तो आता 85 डॉलर्सच्या खाली आला आहे. त्यामुळे भारतात इंधन स्वस्त होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून शनिवारी सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 30 ते 35 पैशांची वाढ झाली आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील.पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 30 पैशांनी वाढून 113.08 रुपये इतका आहे. तर डिझेलच्या दरात 34 पैशांची वाढ झाल्यामुळे एका लीटरसाठी 103.97 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 107.24 आणि 95.98 रुपये इतका आहे. इंधनाची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास पेट्रोल लवकरच 120 रुपये प्रतिलीटरचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दररोज 6 वाजता बदलतात किंमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा