Subscribe Us

header ads

सीईटीमध्ये युनिक अकॅडमीचा पुन्हा एकदा झेंडा क्‍लासेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार

बीड स्पीड न्यूज 

बीड प्रतिनिधी_ बीडच्या शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तेचा नवा आदर्श निर्माण केलेल्या युनिक अकॅडमीने सीईटी परिक्षेत पुन्हा एकदा यशाचा झेेंडा रोवला आहे. क्‍लासेसच्या विद्यार्थ्यांनी या परिक्षेत चांगले गुण मिळवले असून याबद्दल विद्यार्थी व पालकांचा सत्कार क्‍लासेसचे संचालक इंजि.हर्षल केकान यांच्या हस्ते करण्यात आला.सीईटी परिक्षेचा निकाल बुधवार दि.27 रोजी जाहीर झाला. यामध्ये क्‍लासेसच्या मानसी खोड (96.22 पर्सेंटाईल) (पीसीएम टॉपर),  अमेय रायके (96.85 पर्सेंटाईल, मॅथमॅटीक्स टॉपर), आदिती सुभेदार (95.36 पर्सेंटाईल), अक्षयराज भवर (94.03 पर्सेंटाईल), ओम पाखरे (94.47 पर्सेंटाईल), माहेश्‍वरी जाधव (93.35, पर्सेंटाईल),सुमित ढगे (93.64 पर्सेंटाईल), वैष्णवी चव्हाण (91.49 पर्सेंटाईल), निखील गर्कळ (91.53 पर्सेंटाईल), गोपाल बडगे (91.11 पर्सेंटाईल),  आदित्य सिरसट (93.12 पर्सेंटाईल),  अनघा पवार (92.37 पर्सेंटाईल), उमेश ढोले (90 पर्सेंटाईल), मानसी मधुरकर (89.39), क्षितीजा तिपाले (85.45), यशवंत जायभाय (87.32), विवेक सपकाळ (82.83 पर्सेंटाईल), कार्तिक लड्डा (82.25 पर्सेंटाईल), सार्थक तेरखेडकर (83.41 पर्सेंटाईल), हर्षल कासट (85.15 पर्सेंटाईल), विश्‍वजीत वाघ (87.23 पर्सेंटाईल), आशिष नागरगोजे (83.55 पर्सेंटाईल) या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. याबरोबरच इतर विद्यार्थ्यांनीही चांगले गुण मिळवले आहेत. या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार क्‍लासेसचे संचालक इंजि.हर्षल केकान यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी केकान सर यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सत्कार सोहळ्यास विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा