Subscribe Us

header ads

टाकळी येथे झालेल्या बलात्कार प्रकरणी वंचित बहुजन आघाडीची टाकळी गावास भेट (पीडित मुलीच्या आई-वडिलांना दवाखान्यात जाऊन केली विचारपूस)


प्रतिनिधी_परांडा- उस्मानाबाद  दि.3 ऑक्टोबर 2021 येथील टाकळी तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद येथील अकरा वर्षाच्या मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी वंचित बहुजन आघाडी च्या परंडा तालुका आणि जिल्हा कार्यकारिणीने सदर गावास भेट देऊन विचारपूस केली आणि सदर पीडित मुलगी दवाखान्यामध्ये उपचार घेत असल्याने दवाखान्यात जाऊन वैद्यकीय अधिकारी यांना तिच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली.आरोपी प्रकाश शंकर बारस्कर वय वर्षे 23 यास अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुलीचा चुलता ज्ञानेश्वर पवार यास विचारपूस केली असता दिनांक 30 सप्टेंबर रोजी दुपारी तीन ते चारच्या दरम्यान टाकळी या गावातील महादेव माळी यांच्या कापसाच्या पिकात सदर आरोपीने पीडित मुलगी दळण्यासाठी बापू बारस्कर त्याच्या पिठाच्या गिरणी कडे गेले असता तीस आरोपीने अचानक पाठीमागून येऊन तोंड दाबून कापसाच्या पिकात उचलून नेऊन बलात्कार केला .स्वतः मुलीने घटनेची हकीकत आपल्या आई-वडिलांना  सांगितली .घाबरलेल्या अवस्थेत ती मुलगी होती.घटनेची वाच्यता केल्यास आणखीन दोन तीन मुलीवर असाच प्रकार करेन अशी त्याने धमकी दिली होती. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के, जिल्हा प्रवक्ते डॉ शहाजी चंदनशिवे ,जिल्हा सहसचिव मोहन दादा बनसोडे, परंडा तालुका महासचिव दयानंद बनसोडे, तालुका प्रवक्ता रणधीर मिसाळ आणि किरण बनसोडे उपस्थित होते. फुले-आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक डॉ शहाजी चंदनशिवे यांनी परंडा ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या मुलीच्या तब्येतीची वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेख यांना विचारपूस केली व तिच्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले .डॉक्टरांनी मुलीची तब्येत सध्या स्थिर आहे असे सांगितले व ती घाबरलेल्या अवस्थेत आहे तिला स्वतंत्र रूम मध्ये शिफ्ट करण्यात आले आहे आणि तिच्यावर उपचार चालू आहेत.उपचार झाल्यानंतर तिला मानसोपचार तज्ञाची  आवश्यकता भासणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. सध्या पीडित मुलीचे सर्व कुटुंब दवाखान्यामध्ये मुलीच्या तब्येतीची काळजी घेत आहेत. पीडित मुलीच्या घरच्यांना काही अडचण आल्यास वंचित बहुजन आघाडी आपल्या पाठीशी आहे असे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के तसेच मोहन दादा बनसोडे यांनी सांगून सर्व कुटुंबास आधार दिला. आरोपीस कठोर शासन व्हावे यासाठी वंचित बहुजन आघाडी सर्वपोतरी प्रयत्न करणार आहे असे यावेळी सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा