Subscribe Us

header ads

भाजप आमदार नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ

बीड_केज विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान भाजप आमदार नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. रस्त्याच्या कामावरून दोन महिन्यांपूर्वी हा प्रकार घडला होता. मात्र याची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अक्षय मुंदडा यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलंय, की दोन महिन्यांपूर्वी ऋषिकेश अण्णासाहेब लोमटे यांचा फोन आला. त्याने फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धमकी दिल्याचा प्रकार घडला. रस्त्याच्या कामावरून दोन महिन्यांपूर्वी हा प्रकार घडला होता. मात्र याची ऑडिओ क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.अक्षय मुंदडा यांनी सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी ऋषिकेश अण्णासाहेब लोमटे रा. अंबाजोगाई यांचा फोन आला. त्यांनी फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी संभाषण रेकॉर्ड करून घेतले.दरम्यान देवस्थानच्या रस्त्याच्या कामावरून हा वाद चव्हाट्यावर आला आहे. आधी ऋषिकेश लोमटे यांनी कॉलवरून विनंती करत रस्त्याचे काम सुरू करू देण्याची मागणी केली. मात्र विनंती करूनही आमदार पतीने न ऐकल्यामुळे ऋषिकेश लोमटे यांना राग अनावर झाला आणि त्यांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली. आता या ऑडिओ क्लिप वरून विकास कामांमध्ये खोडा घालण्याचे काम कोण करतय याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. याप्रकरणी अक्षय मुंदडा यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर ठाण्यात कलम 500, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा