Subscribe Us

header ads

वृध्दसन्मान दिनी सेवानिवृत्तांचा वाढदिवस संपन्न

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड (प्रतिनिधी) दि.०३ सेवानिवृत्तीचा काळ म्हणजे आपली कोणास गरज नाही असा बहुतेक सेवानिवृत्ती धारकांचा समज असतो. परंतु महाराष्ट्र राज्य तसेच केंद्र सरकार देखील वृद्धांचा जीवनप्रवास सुखाचा जावा म्हणून त्यांच्या आरोग्याची अनेक योजना आखून काळजी घेत आहे. त्यांचा उर्वरित काळात सुखाचे क्षण यावेत व त्यांच्या सेवा कालीन प्रगल्भ अनुभवाचा लाभ व्हावा म्हणून महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय मंत्रालयीन कर्मचारी संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष यशवंत राणाप्रताप कदम यांनी ज्येष्ठ नागरिक दिनी सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी सखाराम उजगरे साहेब यांचा सत्कार समारंभ सेवानिवृत्त बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ जुलाहा कार्यालय, धानोरा रोड बीड येथे आयोजित करून त्यांना सन्मानित केले.योगायोगाने धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत वासनिक यांचा जन्म वाढदिवसाच्या अवचित्त साधून त्यांचा देखील सत्कार संपन्न करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षपदी कँप्टन राजाभाऊ आठवले होते तर शिवाजीराव पडींत सर, सेवानिवृत्त तहसीलदार अनंतराल सरवदे प्रमुख पाव्हुणे म्हणुन उपस्थित होते. प्रशांत वासनिक आपल्या सत्कार समारंभ प्रसंगी म्हणाले की, खरं म्हणजे हा सत्कार समारंभ सेवानिवृत्त वयोवृध्दांचा आहे. तरी पण आपल्या सारख्या अनुभवी व प्रशासकीय कामाचा प्रगल्भ अनुभव असलेल्यांच्या मोलाचे मार्गदर्शन ऐकण्या करता मी येथे उपस्थित आहे. आपण सेवानिवृत्तीनंतर रिकाम टेकड्या गप्पा न करता समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून काम करत आहात. करोना काळात कॅप्टन राजाभाऊ आठवले, प्रा. अशोक गायकवाड व मला स्वतः योग्य ते मार्गदर्शन मिळाल्यामुळे आम्ही तिघांनी करुणा काळात गरजूला जिवनाश्यक वस्तुंच्या किटचे वाटप योग्य प्रकारे विटप करण्याचे कार्य करण्यास प्रोत्साहन मिळाले. आपणा सर्वांचे असेच मार्गदर्शन तरुण पिढीला राहो अशी मनोमन आपेक्षा व्यक्त केली. उपासक उजगरे सखाराम यांनी देखील सत्काराबद्दल यथोचित भावना व्यक्त केल्या व प्रत्येकाने आपल्या जीवनात होईल तेवढे दहा पारमिता जोपासून समाजाचे आपण काही देणे लागतो असे स्पष्ट केले. सेवानिवृत्त तहसीलदार अनंतराव सरवदे यांनी देखील आपले विचार व्यक्त करून जन्मदिवस साजरा करने म्हणजे कणाकणाने आपण ज्याला जन्म आहे त्याला मृत्यु आहे. ह्या सत्याकडे वाटचाल करत असतो..असे असले तरी प्रत्येक क्षण माणसाने माणसाशी माणसा सारखे वागून आपले जीवन व्यतीत केले पाहिजे असे प्रतिपादन केले. सेवानिवृत्त प्रत्येक सभासदांचा जन्मदिवस साजरा करण्याचा उपासक यशवंतराव कदम यांनी संकल्प जाहीर केला. जन्म वाढदिवशी ज्यांचा सत्कार आहे त्यांना महामानवाचे चरित्राचे पुस्तक भेट देण्याचे वाचाल तर वाचाल वाचनालयातर्फे जाहीर करण्यात आले. अध्यक्षीय समारोपात अध्यक्ष कॅप्टन आठवले म्हणाले की जी माणसं एकत्रित येतात, विचार विनिमय करतात व कृतिकार्यक्रम ठरवितात, कार्यास प्रवृत्त होतात व समाजोपयोगी कार्य करू शकतात, संकट प्रसंगी संकटास तोंड देण्यास तत्पर सेवा देऊ शकतात. कार्यक्रमास दळवी बी.जी. सोनवणे विठ्ठलराव, जोगदंड सूर्यकांत, विद्याधर सुधाकर, राऊत डी.एम. मजमुले धर्मराज, गायकवाड दादाराव, प्रा. अशोक गायकवाड, इंजि. तरकसे वसंतराव व गायकवाड सुमनताई उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक जी. एम. भोले सर यांनी केले तर डी.जी वानखडे यांनी आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा