Subscribe Us

header ads

काळेगाव हवेली येथे चोरांचा धुमाकूळ गाडीसह वीस हजार रुपये केले लंपास


प्रतिनिधी नवनाथ गोरे
🔶🔷🔶🔷🔶🔷

वाकनाथपुर प्रतिनिधी_ बीड तालुक्यात चोरीचे प्रमाण वाढले असुन रोज कोठे ना कोठे चोरीच्या घटना घडत आहेत.शनिवार दिनांक २ ऑक्टोंबर रोजी काळेगाव हवेली येथील केदारनाथ अर्जुन डोके हे ऐका घराला कुलूप लावून  दुसऱ्या घरात झोपले असता अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला घरातील ठेवलेले वीस हजार रुपये आणि घरा समोर उभी असलेली मोटरसाकल क्र.MH- २३- AM- ०७७२ अंदाजे किंमत वीस हजार रुपये असे चाळीस हजार रुपये   चोरी करून पोबारा केला सकाळी ही घटना लक्षात येताच केदारनाथ यांनी रविवार दिनांक ३ ऑक्टोंबर रोजी पिंपळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरा विरोधात कलम ४५७.३८० भा. द .वी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पिंपळनेर पोलीस करत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक