Subscribe Us

header ads

बीड जिल्ह्य़ातील ईनामी देवस्थान जमिन गैरव्यवहार प्रकरणात ईडीमार्फत चौकशी करून तत्कालीन उपजिल्हाधिकारी भु-सुधार प्रकाश आघाव पाटील यांना अटक करा:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर


बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड प्रतिनिधी_बीड जिल्ह्य़ातील विविध  मंदिर ,मशिद, दर्गाह आदि.धार्मिक स्थळांच्या ईनामी जमिन बोगस दस्तावेज तयार करून बेकायदेशीर रित्या आधिकारात नसताना खाजगी व्यक्तिच्या नावावर केल्याबद्दल तत्कालीन उपजिल्हाधिकारी भु-सुधार प्रकाश आघाव पाटील, नरहरी शेळके यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी  तसेच बोगस जमिनींचे बनावट फेरफार रद्द करण्यात येऊन देवस्थानच्या नावे नोंदि करण्यात याव्यात  व दफ्तर दिरंगाई केल्याबद्दल संबधित प्रशासकीय आधिका-यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर  , शेख युनुस च-हाटकर,संदिप जाधव, डाॅ.संजय तांदळे यांच्या नेतृत्वाखाली   विविध देवस्थान जमिन गैरव्यवहार प्रकरणातील तक्रारदार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास बसलेले आहेत. 

सविस्तर माहीतीस्तव 
--
बीड जिल्ह्य़ातील विविध धार्मिक स्थळांच्या ईनामी देवस्थान जमिनी आधिकारात नसताना बनावट दस्तावेज तयार करून खिदमतमास जमिनी मदतमास दाखवून खाजगी व्यक्तींच्या नावे करण्याचे रॅकेट तत्कालीन उपजिल्हाआधिकारी नरहरी शेळके, प्रकाश आघाव पाटील तसेच स्थानिक राजकीय पुढारी, महसुल प्रशासनातील आधिकारी तहसिलदार, मंडळ आधिकारी, तलाठी यांनी संगनमतानेच शासनाची दिशाभूल केली असून आर्थिक नुकसान व भाविकांच्या भावनेला ठेस पोहचवली असून संबधित प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी अंबाजोगाई येथील थोरले दत्तात्रेय देवस्थान स्वाती लोमटे ,वर्षाताई लोमटे,  सुलोचना लोमटे, लक्ष्मीताई वडवणकर, राम लोमटे, तसेच रूईनालकोल ता.आष्टी.जि.बीड  येथिल शेख महंमद दर्गाह देवस्थान अनिश शेख, जमिरशेख, खडकत  ता.आष्टी.जि.बीड  येथील विठोबा देवस्थान,अतुल शिंदे, कल्याण काळे, सुनिल पवार, मौजे पालवण  ता.जि.बीड येथील श्रीराम देवस्थान संदिप शेळके,रावसाहेब शेळके  आदिठीकाणचे तक्रारदार आंदोलनास उपस्थित होते .

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 
मो. नं.8180927572

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा