Subscribe Us

header ads

युती होईल नाही तो भाग वेगळा, कार्यकर्त्यांनी स्वबळाची तयारी करावी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशुख यांचे आवाहन

 बीड स्पीड न्यूज

प्रतिनिधी | शिरूर_तालुक्यातील कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. युती होईल किंवा नाही हा भाग वेगळा. पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी स्वबळाची तयारी करावी, असे आवाहन काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केले.शिरूर येथे जिजामाता चौक परिसरात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. याप्रसंगी देशमुख बोलत होते. युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा केजचे नगराध्यक्ष आदित्य पाटील, युवा नेते राहुल साेनवणे, ज्येष्ठ नेते जुबेर चाऊस, मीनाक्षी पांडुळे, रवी ढोबळे, घोडके मामा, भास्कर केदार, अशोक बहिरवाळ, रमेश सानप, बीड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष संभाजी जाधव, काँग्रेस पाटोदा युवक तालुकाध्यक्ष राहुल जाधव, उमर चाऊस, विकास सानप, अशोक केदार, राम शेळके, असिफ शेख, सरफराज कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.काँग्रेस जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी पक्ष संघटन विस्तारासाठी यापुढे कार्यकर्त्यांनी पुर्ण ताकदीने पुढे येण्यासाठीच्या सूचना दिल्या. यासह काँग्रेस आता येणाऱ्या काळात जोमाने काम करणार असल्याने सर्व कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. काँग्रेस नेते आदित्य पाटील म्हणाले, रजनीताई पाटील या खासदार झाल्याने काँग्रेसच्या बळकटीसाठी आपण प्रयत्न करणार असून कार्यकर्त्यांनीही पक्षाचे ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत, यासाठी पुढाकार घ्यावा. राहुल सोनवणे म्हणाले, जुने कार्यकर्ते व नवीन कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करत पक्षाचा विस्तार करण्याचे ध्येय असून यात कार्यकर्त्यांनी सहभाग घ्यावा. यावेळी इतरांनीही मार्गदर्शन केले. यावेळी मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा