Subscribe Us

header ads

रूपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती ; उद्या पदभार स्वीकारणार!

बीड स्पीड न्यूज 

मुंबई_राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांची अखेर आज महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक महिन्यांपासून हे पद रिक्त होते व या पदासाठी रूपाली चाकणकर यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा सुरू होती. अखेर, आज राज्य सरकारकडून अधिसूचना काढून याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली. रूपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा उद्या पदभार स्वीकारणार आहेत.याआधी भाजपाच्या विजया रहाटकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी होत्या. यानतंर हे पद रिमकाम होतं. महिलांवरील अत्याचार वाढत असताना अध्यक्षपदी कोणाचीही नेमणूक होत नसल्याने जोरदार टीका होत होती. या पदासाठी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण तसंच माजी सनदी अधिकारी चंद्रा अय्यंगार यांचं नावही चर्चेत होतं. पण रुपाली चाकणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांच्या नियुक्तीला अप्रत्यक्षपणे विरोध दर्शवला होता.महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका. अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल,” असं चित्रा वाघ यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा