Subscribe Us

header ads

शाहरुख खानने भाजपामध्ये प्रवेश केल्यास आर्यनला जामीन मिळेल; आचार्य प्रमोद

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला आज पुन्हा एकदा जामीन नकारण्यात आला. सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगामध्ये असणाऱ्या आर्यन खानला न्यायालयाने दिलासा दिलेला नाही. आर्यन हा ३ ऑक्टोबरपासून तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे. २ ऑक्टोबरच्या रात्री मुंबईच्या समुद्रात कॉर्डेलिया क्रूझवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबीने छापा टाकल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. मात्र आर्यनला जामीन नाकारण्याच्या आधापासूनच म्हणजेच आज सकाळपासूनच या प्रकरणाची सोशल नेटवर्किंगवर चर्चा सुरु होती. त्यातच एका अध्यात्मिक गुरुंनी आर्यनला तुरुंगामधून सोडवण्यासाठी सल्ला देताना यंत्रणांच्या कारभारावर अप्रत्यक्षपणे टीका केलीय.
आचार्य प्रमोद यांनी आपल्या व्हेरिफाइड ट्विटर हॅण्डलवरुन सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी या प्रकरणासंदर्भात एक ट्विट केलं आहे. शाहरुखने भाजपामध्ये प्रवेश केल्यास मुलगा आर्यनला जामीन मिळण्याबरोबरच देशभक्त असल्याचं प्रमाणपत्रही शाहरुखला मिळेल असं आचार्य प्रमोद यांनी म्हटलंय. “शाहरुख खानने भाजपामध्ये प्रवेश घेतला पाहिजे. मुलाला जामीन मिळण्याबरोबरच त्याला देशभक्तीचं प्रमाणपत्रही मिळेल,” असं ट्विट त्यांनी केलंय. या ट्विटमध्ये त्यांनी शाहरुखला टॅगही केलं आहे. तसेच #AryanKhanBail हा हॅशटॅगही वापरलाय आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा