Subscribe Us

header ads

कामगार पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अर्धनग्न आंदोलन

बीड_बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं आहे मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शासनाचे अधिकारी पंचनाम्याचे नाटक करत असून पंचनाम्याचे नाटक थांबून शेतकऱ्यांना सरसकट हेक्‍टरी 50 हजार रुपयांची तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
एफआरपीचे तीन तुकडे न करता उसाची एफआरपी एकरकमी 14 दिवसाच्या आत देण्यात यावी, त्याबरोबरच 2020 मधील पिक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा.नदीकाठच्या पूरग्रस्त भागातील गावांचा पुनर्वसन करा यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. दरम्यान यावेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा