Subscribe Us

header ads

महात्मा गांधींच्या घोषवाक्याचे प्रतीक असलेल्या माकडाची तोडफोड; तोडफोड करणार्‍यावर गुन्हा दाखल करून प्रतिकृतीची पुनर्स्थापना करा---डॉ. संजय तांदळे

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड (प्रतिनिधी) दि.२२ महात्मा गांधींच्या घोषवाक्याचे प्रतीक असलेल्या माकडाची तोडफोड करणार्‍यावर गुन्हा दाखल करून माकडाच्या प्रतिकृतीची पुनर्स्थापना करा. अशी मागणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्याधिकारी आदींना दिलेल्या निवेदनातून केली आहे.या विषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शहरातील जिल्हा कारागृहामागे माने कॉम्प्लेक्स चौकात असलेल्या महात्मा गांधींच्या बोध वाक्याचे प्रतीक असलेल्या तीन माकडांपैकी एका माकडाच्या प्रतिकृतीची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केली असून संबंधिताने तोडफोड करून तीन माकडांच्या या प्रतिकृतीचे नुकसान करत विद्रुपीकरण केले आहे. काही वर्षांपूर्वी शहराच्या विविध चौकात बीड नगरपरिषदेने लाखो रुपये खर्चून वेगवेगळे देखावे व प्रतिकृती बसविल्या आहेत. यात जिल्हा कारागृहामागे असलेल्या माने कॉम्प्लेक्स समोर महात्मा गांधींचे बोधवाक्य असलेले ‘बुरा मत देखो, बुरा मत सूनो, बुरा मत कहो’ हा संदेश देणारे तीन माकड बसविण्यात आले होते. मात्र या तीन माकडांपैकी ‘बुरा मत देखो’ हा संदेश देणार्‍या माकडाची प्रतिकृती कुठल्यातरी माथेफिरूने दगडाने तोडून टाकली आहे. समाजात वावरणार्‍या या माथेफिरूचा शोध घेवून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा व तोडफोड करण्यात आलेल्या ‘बुरा मत देखो’ या माकडाच्या प्रतिकृतीची पुनर्स्थापना करण्यात यावी. अशी मागणी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्याधिकारी यांच्याकडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे, मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़, शेख युनूस, इंजि.शेख मुहम्मद मोईज़ोद्दीन, दत्तात्रय सौंदरमल, संदीप जाधव आदींनी निवेदनाद्वारे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा