Subscribe Us

header ads

आवैध वाळु वाहतुक करणाऱ्या वाहनावर कारवाई; 35 लाखाचा मुद्देमाल जप्त!

बीड स्पीड न्यूज 

गेवराई_गेवराई तालुक्यातील चकलंबा पोलीसांनी आवैध वाळु वाहतुक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत 35 लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.तालुक्यातील राक्षसभुवन येथील गोदावरी पात्रांमध्ये अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती चकलंबा पोलिस ठाण्याचे पो नी भास्कर नवले यांना मिळाली माहिती नुसार दि १७ रोजी दुपारी राक्षसभुवन येथील गोदापात्रात जाऊन पाहणी केली असता एक हायवा गाडी मधे जेसीबी च्या साह्याने अवैद्य वाळू तस्करी केली जात आसल्याचे निर्दनास आले त्या नुसार पो कर्मचाऱ्यासह पो नी भास्कर नवले यांनी दोन्ही वाहनावर कारवाई करत ताब्यात घेतले असुन या कारवाईत 35 लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आसुन सदर वाहने पोलीस ठाणे चकलंबा येथे लावणत आली आहे. संबधीत व्यक्ती वर पो स्टे चकलांबा येथे गु र न 255/21 कलम 379,188,34,511 भदवी,144 कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा