Subscribe Us

header ads

परळीचा ऋषिकेश आघाव चमकला आंतरराष्ट्रीय सायबर पटलावर

बीड स्पीड न्यूज 

परळी वै.ता.१८ प्रतिनिधी_परळी तालुक्यातील सारडगाव येथील सायबर इंजिनियर ऋषिकेश उद्धव आघाव हा  सध्या केंद्र सरकारच्या ग्रह मंत्रालय अंतर्गत "ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट" मध्ये हैदराबाद येथे  'डिजिटल फॉरेन्सिक एक्सपर्ट'  या पदावर कार्यरत आहे. या संस्थेमार्फत केंद्रीय पोलिसांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. नुकतेच दिनांक 16 नोव्हेंबर रोजी भारत सरकार तर्फे 'कंबोडिया'  या देशातील पोलीस अधिकाऱ्यांना प्रथमच आंतरराष्ट्रीय ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले. आपल्या देशातील नामांकित तज्ञाकडून विविध गुन्हे शोधणे बाबत दिवसभर प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये ऋषिकेश आघाव याने सायबर फोरेन्सिक विषयावर  'कंबोडिया' देशातील पोलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ९० मिनिटाचा क्लास घेतला. ऋषिकेशला भारतातर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावर क्लास घेण्याची ही एक सुवर्णसंधी लाभली. विषयाचा सखोल अभ्यास, कठोर परिश्रम व उत्तम नियोजन आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन यामुळे त्यास ही संधी मिळाली. याबद्दल तरुण इंजिनीयर ऋषिकेशचे सायबर क्षेत्रातील तज्ञांकडून अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा