Subscribe Us

header ads

बीड ते पिंपळनेर रस्त्या साठी आज उमरद खालसा येथे बैठक

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

वाकनाथपुर प्रतिनिधी_बीड ते पिंपळनेर हा रस्ता खुप खराब झाला आहे वेळोवेळी प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा हा रस्ता बनत नाही या रस्त्याने मोठे मोठे कार्यकर्ते. युवा नेते वागतात पण कोणीही रस्ता साठी झटत नाहीत सर्व आपापले फायदे बघुन गप्प बसतात  या रस्त्याच्या खड्डयात पडून अनेक अपघात झाले आहेत आणि होत आहेत आता याचं रस्त्यासाठी या भागातील .उमरद खालसा. बऱ्हाणपूर. नागापुर. वाकनाथपुर. भाटसांगवी. खांडे पारगाव. म्हाळस जवळा. म्हाळसापुर. ईट. पिंपळनेर. नाथापुर येथील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत आज शुक्रवार दिनांक १९ नोव्हेंबर. रोजी उमरद खालसा येथील सिद्धिविनायक पेट्रोल पंप येथे या 

भागातील नागरिकांनी बैठक घेऊन  दिनांक २३ वार मंगळवार रोजी जिल्हाअधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार आहे असा या बैठकीत निर्णय घेण्यात आला तसेच रस्ताचे काम लवकरात लवकर जर झाले नाही तर या  सर्व भागातील गावांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येणार असा आज झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला तसेच बांधकाम विभाग आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत  शेकडो नागरिकांनी आज आपला रोश  व्यक्त केला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा