Subscribe Us

header ads

नगर रोड, झाला मृत्युचा सापळा.! सर्वत्र खड्डे आणी‌ धुळीने शहरातील नागरिकांंत होतोय प्रचंड संताप आमदारांचा दुर्लक्ष!

बीड स्पीड न्यूज 

बीड प्रतिनिधी/दि.19 बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून चर्‍हाटा फाटा ते नवगण राजुरीपर्यंत नगर रोडवर मोठ मोठे खड्डे पडले असल्याने शहरातील वाहन धारकांना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.बीड नगर रोड रस्ता पूर्ण पणे खराब झाला आहे. काही दिवसा पूर्वी याच 
नगर रोड वरती अनेक अपघात या खड्या मुळे झाले अनेक लोकांचे मणके या खड्या मुळे मोडले तेव्हा कुठे थातुरमातुर खड्डे बुजवले पण दुर्देयवाने हे खड्डे दोन महिने हि टिकले नाही आजही या खड्ड्यांमुळे रोज अपघात होत आहेत. तसेच बीड शहरातील नगर रोड, वरील धूळीने नागरिकांतून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या सर्व 
गोष्टीला जनता कंटाळली आहे, रोजचा प्रवास आणि खराब रस्ता हा धोके - दायक दिसत असल्याने नागरिकांना जिव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या मुळे शहरातील नागरिक खुप परेशान झाले आहेत. प्रशासनाचे व आमदारांचे या रस्त्याकडे का दुर्लक्ष होत आहे.? असे अनेक प्रशन जनतेतुन बोलले जात आहे. बीडला जाणे म्हणजे जिवावर उदार होऊन जावे लागत आहे. तरी शासनाने लवकरात लवकर उपाय योजना कराव्यात. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा