Subscribe Us

header ads

देशामध्ये समता स्वातंत्र्य बंधुता या संविधानातील अधिकारांचा अभाव दिसून येतो--- एडवोकेट अमोल पाटील

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी डॉ शहाजी चंदनशिवे 

परांडा -दिनांक 25 नोव्हेंबर 2021 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची घटना लिहिली. भारत देशाला संविधान  अर्पण केले .देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणले आणि संविधानावर संपूर्ण देश चालतो. संविधानाने माणूस म्हणून जगण्याचा सर्वांना अधिकार दिला परंतु काही निष्क्रिय नेतृत्वामुळे देशामध्ये समता स्वातंत्र्य बंधुता या मूलभूत अधिकारांचा अभाव दिसून येतो असे प्रतिपादन परंडा न्यायालयातील एडवोकेट अमोल पाटील यांनी शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयात आयोजित केलेल्या एकदिवशीय चर्चासत्रामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ दीपा सावळे या उपस्थित होत्या तर व्यासपीठावर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे ,आय क्यू ए सी चे चेअरमन डॉ महेशकुमार माने ,राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ विशाल जाधव आणि कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा दत्ता मांगले उपस्थित होते .यावेळी राधिका साडेकर अक्षा काझी आणि अमृता अलबते या विद्यार्थ्यांनी आपले शोधनिबंध सादर केले. प्रा संभाजी धनवे ,उत्तम कोकाटे आणि प्रा दीपक ओव्हाळ यांनी आपली मनोगते व्यक्त केली .अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ दीपा सावळे 

म्हणाल्या की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्व घटनेचा अभ्यास करून भारत देशाची घटना अचूकपणे लिहिली .घटनेने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला तेव्हा देशातील सर्व जनतेने भारतीय संविधानाचे मूल्य चांगल्या प्रकारे जोपासले पाहिजेत .विद्यार्थी हा देशाचा कणा आहे त्यांनी संविधानाचे वाचन केले पाहिजे .समाजामध्ये संविधान समजावून सांगितले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले . कार्यक्रमाचे आयोजन संस्कृती विभाग आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या वतीने करण्यात आले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ राहुल देशमुख ,हनुमंत मार्तंडे ,रामराजे जाधव यांनी सहकार्य केले . यावेळी डॉ कृष्णा परभने डॉ प्रकाश सरवदे आणि शिक्षकेतर कर्मचारी covid-19 चे पालन करत मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले तर आभार डॉ विशाल जाधव यांनी मानले. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा