Subscribe Us

header ads

स्वराज नगर येथील जनतेला भर दिवाळीत अंधारात ठेवले आम आदमी पार्टीने भांडाफोड कॉर्नर बैठक घेतली

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड प्रतिनिधी_बीड येथील समृद्ध मानला जाणारा भाग म्हणजे स्वराज्य नगर नावाने ओळखला जातो या भागांमधील सर्व नागरिक सर्व टॅक्स भरतात  पाणीपट्टी आरोग्य टॅक्स, शिक्षण टेक्स, रोड टॅक्स, सफाई, सौंदर्यीकरण, वृक्षारोपण, येथील नागरिक हे सर्व टॅक्स इमानदारीने भरतात. परंतु या भागातील नागरिकांना बीड नगरपरिषद बीड नगर अध्यक्ष मा. भारतभूषण जी शिरसागर हे मागील निवडणुकीमध्ये सर्वात जास्त मताधिक्क्याने निवडून येण्यासाठी येथील नागरिकांनी भरभरून त्यांना मतदान केले होते परंतु तेथील नागरिकांना फक्त आणि फक्त त्यांच्या नशिबी फुटलेले नाळ, खड्डे असलेले रोड, बंद पडलेल्या नाल्या, नाल्यांचे पाणी सर्व घरांमध्ये घुसत असलेले दिवाळीच्या काळा मध्येच तेथील संपूर्ण नगरातील विद्युत महामंडळाने संपूर्ण लाईट कट केलेला आहे. हा संपूर्ण भाग अंधारमय असून बीडचे नगर प्रशासन संपूर्ण टॅक्स वसूल करून तो कोणाच्या घशात घातला ते सांगायला तयार नाही. टॅक्सचा हिशोब विचारण्यासाठी आम आदमी पार्टी नगरपरिषदेवर एक मोठे जन आंदोलन उभे करणार आहे आज रात्रीच्या वेळी या भागातील सर्व नागरिकांना एकत्रित करून या नगरपालिकेचा भांडाफोड करण्याचं काम आम आदमी पार्टी करत आहे सर्व नागरिकांशी चर्चा करून त्यांनी भरलेला टॅक्स त्याचा मोबदला सामान्य नागरिकांना मिळाला पाहिजे त्या टॅक्सचा हिशोब विचारण्यासाठी सर्व नागरिक नगरपालिकेमध्ये येणार आहेत या रात्रीच्या दौऱ्यामध्ये आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे शहराध्यक्ष सय्यद सादिक सचिव रामधन जी जमाले अभिषेक टाळके योगेश पवळ व तेथील समस्त नागरिक उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा