Subscribe Us

header ads

शेतकरी विरोधी तिन्ही काळे कायदे रद्द; वंचित कडुन फटाके फोडुन जल्लोश साजरा वंचित बहुजन आघाडी च्या किसान बाग आंदोलनाला यश--- युनुसभाई शेख

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड प्रतिनिधी / जगाचा पोशिंदा  शेतकरी एक वर्षापासून राजधानी दिल्ली येथील हरियाणा बॉर्डर उपोषणाला बसला होता संपूर्ण देशात या शेतकरी आंदोलनाचे  पडसाद उमटले या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी 27 जानेवारी 2021 ला आंदोलन चालू केले व संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्हा तालुका कचेरीवर हे आंदोलन करण्यात आले, शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या तीन काळे  कायदा रद्द करा रद्द करा या मागणी साठी महाराष्ट्र एकवटला होता त्याचा परिपाक म्हणून आज केंद्रातील भाजप सरकारने तीन्ही  काळे कायदे रद्द करत असल्याचे जाहीर करताच वंचित बहुजन आघाडी चा आंदोलन करताना मध्ये आनंदाचे वातावरण पसरले  बीड शहरामध्ये या पार्श्वभूमीवर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सहसचिव युनूस भाई शेख, बालाजी जगतकर, अजय सरवदे,लखन जोगदंड,संदिप जाधव,  शहर ,तालुका व जिल्हा पदाधीकारी, शेतकरी  भगवान वनवे,सह मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा