Subscribe Us

header ads

दैनिक लोकपत्रचे प्रतिनीधी नारायण यम्मेवार यांना कै.गोपीनाथराव मुंडे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर

उमरी तालुका प्रतिनीधी प्रकाश कारलेकर


दैनिक लोकपत्रचे प्रतिनीधी नारायण यम्मेवार यांना कै.गोपीनाथराव मुंडे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर


उमरी प्रतिनिधी_उमरी तालुक्यातील निर्भीड पत्रकार लोकपत्रचे तालुका प्रतिनीधी नारायण यम्मेवार यांना कै.गोपीनाथराव मुंडे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.हिंदवी बाणा लाईव्हच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कै.दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. दै.लोकपत्रचे तालुका प्रतिनीधी नारायण यम्मेवार यांना कै.गोपीनाथराव मुंडे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 6 जानेवारी रोजी दर्पण दिन असल्याने पत्रकारांचा गौरव झाला पाहिजे या उद्देशाने कै.दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठान च्या वतिने गेल्या तिन वर्षापासुन उत्कृष्ट पत्रकारांना पुरस्कार देऊन गौरव केला जातो.25 डिसेंबर पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले होते.जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व प्रस्ताव आले आहेत.दि.1जानेवारी रोजी हिंदवी बाणा लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त कै.दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठानच्या पदधीकार्याची बैठक घेण्यात आली.तालुक्यातुन आलेल्या प्रस्तावाची छाननी करून हा पुरस्कार जाहीर करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील प्रत्येकी एका पत्रकारास पुरस्कार देण्या संदर्भात प्रस्ताव मागविण्यात आला.यातील एका उत्कृष्ट पत्रकारास खालील प्रमाणे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.तर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या एका निस्वार्थी व्यक्तीस सामाजिक पुरस्कार दिल्या जातो यावर्षी कंधार भुषण सामाजिक पुरस्कार विठ्ठल नारायण मुनगीलवार यांना जाहीर करण्यात आला आहे.हे पुरस्कार वितरण सोहळा कंधार येथे होणार आहे.दैनिक लोकपत्रचे प्रतिनीधी नारायण यम्मेवार यांना कै.गोपीनाथराव मुंडे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तालुक्यात कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा