Subscribe Us

header ads

पर्यावरण पूरक होळी पेटवत मंगेश लोळगे व परिवाराने दिला गोमाता व वृक्ष संवर्धनाचा संदेश

बीड स्पीड न्यूज 

पर्यावरण पूरक होळी पेटवत मंगेश लोळगे व 
परिवाराने दिला गोमाता व वृक्ष संवर्धनाचा संदेश

बीड प्रतिनिधी_ होळी हा सण हिंदुधर्मात अत्यंत महत्वाचा सण मानला जातो या सणाच्या दिवशी वाईट विचार जे काही आहे, ते होळीत दहन करून चांगल्या विचारांचा संकल्प होळीच्या अग्नी समोर केला जातो. परंतु होळीसाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची लाकडे जाळली जात असून त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणावर 

प्रदूषण तर होतेच आहे त्याच बरोबर मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल होत. असून पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. या सर्वांचा विचार करत यंदाची होळी ही पर्यावरण पूरक करत लाकडे न जळता गाईच्या शेणाच्या गौऱ्याची होळी साजरी करून मंगेश लोळगे व त्यांच्या परिवाराने गोमाता व वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला आहे.
कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात ही स्वतःपासून 

केली तर ती इतरांना करण्यास सांगणे योग्य ठरते आज वायू प्रदूषण ही मोठी समस्या जागतिक स्तरावर चिंतेचा विषय आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी प्रत्येक देश आपल्या परीने प्रयत्न करत आहे. आणि नागरिक त्यात आपला सहभाग देत आहेत. आपल्या देशातही प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत झाडे लावा झाडे जगवा मोहीमेत नागरिक आणि वृक्ष प्रेमी यांचा सहभाग वाढत 

असला तरी देखील मोठ्या प्रमाणावर वृक्ष तोड सुरूच आहे त्यातच होळी सारख्या पवित्र सणाला मोठ्या प्रमाणात लाकडे जाळली जात आहेत यामुळे वातावरणात कार्बनचे प्रमाण वाढत आहे. यावर आपणही छोटासा प्रयत्न केला पाहिजे यासाठी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या ची होळी केल्यास वातावरणात शुद्धता येऊन 

ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यास मदत होईल, झाड वाचेल आणि त्यासोबतच गाईच्या शेणाच्या गोवऱ्या विकत घेतल्याने गोशाळेतील गाईंच्या चाऱ्यासाठी मदत होईल हाच उद्देश मनात घेऊन यंदाची होळी ही पर्यावरण पूरक करत लाकडे न जळता गाईच्या शेणाच्या गौऱ्याची होळी साजरी करून मंगेश लोळगे व त्यांच्या परिवाराने गोमाता व वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला आहे. गोविंद गो सेवा प्रकल्प बीडचे प्रमोद पुसरेकर यांनी यंदा अनेक ठिकाणी अशा प्रकारे होळी साजरी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्याच्या या गोरक्षण व पर्यावरण संरक्षण मोहिमेत आगामी काळात सर्वांनी सहभागी व्हावे असे ही मंगेश लोळगे यांनी सांगितले. यावेळी चित्रपट निर्माते ,संगीतकार व संस्कार भारतीचे प्रांताध्यक्ष भरत अन्ना लोळगे ,दिनेश लोळगे,मंगेश लोळगे आदेश लोळगे, संदेश लोळगे ,शुभम लोळगे व लोळगे परिवार.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा