Subscribe Us

header ads

राज्यस्तरीय दर्पणरत्न पुरस्कार हा परळी पत्रकारासाठी गौरवास्पद-डॉ.हरिश्चंद्र वंगे

बीड स्पीड न्यूज 


राज्यस्तरीय दर्पणरत्न पुरस्कार हा परळी पत्रकारासाठी गौरवास्पद-डॉ.हरिश्चंद्र वंगे

परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः- परळी येथील ज्येष्ठ पत्रकार 1993 पासून स्वतःचे परळी समाचार हे वृत्तपत्र नियमितपणे चालवणारे असे जेष्ठ संपादक आत्मलिंग शेटे यांना पुणे येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने उत्कृष्ट पत्रकारितेतील राज्यस्तरीय दर्पणरत्न पुरस्कार प्राप्त झाला. ही परळीकरांसाठी गौरवास्पद बाब आहे. म्हणून आत्मलिंग शेटे यांना मी व माझ्या सर्व सहकार्‍यांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. व त्याला पुढील कार्यालयासाठी आणखी शुभेच्छा दिल्या असल्याचे डॉ.हरिश्चंद्र वंगे दादा यांनी सांगितले. या कार्यक्रमास सर्वश्री दत्ताप्पा इटके गुरूजी, डॉ.दे.घ.मुंडे, डॉ.विवेक दंडे, श्री विलासराव मुंडे, जेष्ठ पत्रकार लक्ष्मणराव वाकडे, प्रशांत जोशी, भास्कर लाड, सुनिल जठार, बाबासाहेब कांबळे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ.लक्ष्मीकांत लोहिया, डॉ.विवेक दंडे, डॉ.दे.घ.मुंडे, प्रशांत जोशी यांनी देखील आत्मलिंग शेटे यांचा सत्कार केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा