Subscribe Us

header ads

हौशी मराठी नाट्य स्पर्धेत एकापेक्षा एक नाटकांचे होतेय सादरीकरण!!

बीड स्पीड न्यूज 


हौशी मराठी नाट्य स्पर्धेत एकापेक्षा एक नाटकांचे होतेय सादरीकरण!!


बीड / प्रतिनिधी_शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाची महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची  प्राथमिक फेरी सुरु आहे. या स्पर्धेत सादर झालेल्या स्त्री सन्मानार्थ मातृधर्म रक्षणार्थ  या नाटकाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. या नाटकातून एकंदरीत समाज व्यवस्थेवर प्रकाश टाकण्यात आला. या स्पर्धेत सादर होणाऱ्या उर्वरित नाटकांचा आनंद घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभिषण चवरे, बीड नाट्य स्पर्धेचे समन्वयक म्हणून मुकुंद धुताडमल यांनी केले आहे.महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा संपन्न होत आहेत. कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा.  त्या कलागुणांमधून व्यक्तिमत्व विकास घडून आणावा. नाट्यकलेचा प्रचार व प्रसार सर्वस्तरातून करावा. सांस्कृतिक वातावरण तयार व्हावे हा उद्देश ठेवून शासन राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन गेली 59 वर्षापासून करत आला आहे. यावर्षी 60 व्या वर्षात राज्यनाट्य स्पर्धा पोहोचली आहे. आपण या स्पर्धेचा आस्वाद घेण्याकरिता व कलावंतांना प्रोत्साहित करण्याकरिता सर्व रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन  सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभिषण चवरे, बीड नाट्य स्पर्धेचे समन्वयक म्हणून मुकुंद धुताडमल यांनी केले आहे. दरम्यान मराठी नाट्य स्पर्धेत स्त्री सन्मानार्थ मातृधर्म रक्षणार्थ नाटक सादर झाले. पंचदेव प्रतिष्ठान अंबाजोगाई यांनी सादर केलेल्या स्त्री सन्मानार्थ मातृधर्म रक्षणार्थ या नाटकाने रसिकांची मने जिंकली. या नाटकाचे लेखक दिगदर्शक डॉ. विनिड निकम यांनी उत्तम प्रकारे दिगदर्शन करून नाटकाची उंची अजून वाढविली आहे. एकंदरीत स्त्री सन्मानार्थ मातृधर्म रक्षणार्थ या नाटकाने  रसिकांच्या मनात घर करून चिंतन करण्यास भाग पडले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक