Subscribe Us

header ads

कस्तुरी बालमनाचा नृत्य-नाट्यमय आविष्कार

बीड स्पीड न्यूज 


कस्तुरी बालमनाचा नृत्य-नाट्यमय आविष्कार
नाट्य स्पर्धा : कस्तुरी नाटकाच्या विषयाने रसिकांना मंत्रमुग्ध केले



बीड  / प्रतिनिधी_शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाची महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची  प्राथमिक फेरी सुरु आहे. या स्पर्धेत सादर झालेल्या 'कस्तुरी' या नाटकाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. या नाटकातून बालमनाचा नृत्य-नाट्यमय आविष्कार रसिकांना पहावयास मिळाला. या स्पर्धेत सादर होणाऱ्या उर्वरित नाटकांचा आनंद घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभिषण चवरे, बीड नाट्य स्पर्धेचे समन्वयक म्हणून मुकुंद धुताडमल यांनी केले आहे.कस्तुरी' हे नाटक आसिफ अन्सारी  लिहिलेले आणि निलिम दोडके दिग्दर्शित केले आहे. या नाटकात राणी, तिचे मन व मुन्नी अशी  तीन पात्रे असे या नाटकाचे कथासूत्र आहे.अपंगत्वामुळे व्हीलचेअरवर असणारी राणी घरची श्रीमंत असूनही व आईबाबांनी तिच्यासाठी सर्व सोयीसुविधा पुरवल्या असल्या तरी त्यांच्या प्रेमासाठी व कौतुकासाठी आसुसलेली आहे. तिच्या भावविश्वातली तिच्या भावना मनाद्वारे ती उलगडून प्रेक्षकांसमोर ठेवते. तर मुन्नी ही घरची गरीब असली तरी आईबाबांचे प्रेम तिला मिळत असते. परंतु मुन्नी चे बाबा आणि दारूच्या आहारी गेलेले असतात. राणी जेव्हा मुन्नीच्या संपर्कात येते तेव्हा मुन्नीला नृृत्यात पारंगत करुन आपली अतृृप्त इच्छा पूर्ण करुन घेते. तिला साक्षरही करते. त्याचबरोबर मुन्नीकडून स्वयंपाक शिकून घेते. कस्तुरीमृृगाला जसा आपल्या बेंबीतील कस्तुरीचा शोध लागत नाही. अगदी तीच अवस्था मुन्नी आणि राणीचीही असते. एकमेकींच्या सहवासात दोघींनाही दडलेल्या 'कस्तुरी'चा  शोध लागतो आणि त्यांचे जीवन उजळून निघते ही नाटकाची मध्यवर्ती कल्पना मांडण्यात आली आहे. राणी, मुन्नी व राणीचे मन या तिघींचेही शेवटचे नृृृृत्य तर अप्रतिमच!किशोर वयातील मुलींचे स्वप्नरंजनासोबत वास्तवता, कौटुंबिक, सामाजिक दाहकताही मांडून मैत्री, प्रेमाचा संदेश देत जीवन जगण्याची कला 'कस्तुरी' या नाटकातून रसिकांनी पहायला मिळाली.पालकांकडूनही काही चुकतं याची जाणीवही कस्तुरी' नाटक करून देतं.दरम्यान या स्पर्धेत सादर होणाऱ्या उर्वरित नाटकांचा आनंद घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभिषण चवरे, बीड नाट्य स्पर्धेचे समन्वयक म्हणून मुकुंद धुताडमल यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा