Subscribe Us

header ads

कारने बाईकला उडवले; अपघातात बाईकवरील दोघे जागीच ठार

बीड स्पीड न्यूज 


कारने बाईकला उडवले; अपघातात बाईकवरील दोघे जागीच ठार


माजलगाव_ माजलगाव-तेलगाव राष्ट्रीय महामार्गावर शिंदेवाडी फाट्यावर आज सकाळी साडेआठ ते नऊ च्या सुमारास एका भरधाव कारचा आणि बाईकचा भीषण अपघात झाला. या अपघातात बाईकवरील दोघांचा मृत्यू झाला. लक्ष्मण भीमराव विघ्ने (वय 60 वर्षे) व सिद्धेश्वर प्रल्हाद जाधव (वय 35 वर्षे) अशी मृतांची नावे असून ते शिंदेवाडी येथील रहिवासी होते.याबाबत प्राथमिक माहिती अशी की, आज सकाळी माजलगावकडून तेलगावकडे एक कार ( एम.एच.44 एस 3203) भरधाव वेगात जात होती. दरम्यान, शिंदेवाडी फाट्यावर चालकाचा ताबा सुटल्याने शिंदेवाडीकडून येणाऱ्या  बाईकवर कार धडकली. यात बाईकवरील लक्ष्मण भीमराव विघ्ने व सिद्धेश्वर प्रल्हाद जाधव हे जागीच ठार झाले.कार रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली.या अपघातात बाईकचा  पूर्णपणे.चेंदामेंदा झाला आहे.दरम्यान, कार भरधाव वेगात होती. असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. आहेत.या कारमधील प्रवासी पण या अपघातामध्ये जखमी झाले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा