Subscribe Us

header ads

आरणवाडी येथे चार शेतकऱ्याचा ऊस जळून लाखोंचे नुकसान;विजेच्या स्पार्कींग ने लागली आग

बीड स्पीड न्यूज 

आरणवाडी येथे चार शेतकऱ्याचा ऊस जळून लाखोंचे नुकसान;विजेच्या स्पार्कींग ने लागली आग


बीड/प्रतिनिधी/धारुर तालुक्यातील आरणवाडी येथे गावाच्या उत्तरेस चार शेतकऱ्यांचा ऊस विजेच्या तारेच्या स्पार्किंग ने लागलेल्या आगीत पूर्णपणे जळून खाक झाला यामुळे या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा करून या शेतकऱ्यास नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.ऊस तोडणी उशीर होत असल्याने अश्या ऊस जळून राख होण्याच्या घटनेत ही तालुक्यात वाढ झाली आहे.धारूर तालुक्यातील दिवसेंदिवस उसाचा प्रश्न गंभीर होत असून ऊस तोडणीला येऊनही कारखाने नेत नसल्याने शेतकरी अगोदरच हैराण झालेले आहेत.अशा परिस्थितीमध्ये उभे ऊस जळण्याचे ही प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.व या आठवड्यात अशा दोन ते तीन घटना तालुक्यात घडल्या आहेत. कि गुरुवारी दुपारी धारूर तालुक्यात अंगणवाडी येथे अशाच प्रकारे विद्युत तारेच्या स्पार्किंग ने पडलेल्या ठिणग्या ने गावाच्या उत्तरेकडील तीन एकर ऊस चार शेतकऱ्याचा जागेवर जळून खाक झाला.या मध्ये कैलास माने, श्रीमंत माने, शिवाजी माने,व आणखी एका शेतकऱ्यांचा समावेश होता.यामुळे या शेतकऱ्यांचे  लाखो रुपयाचे नुकसान झालेले आहे. या परीस्थीती मुळे शेतकरी हातबल झालेले आहेत.या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा