Subscribe Us

header ads

बीडमध्ये नामांकित क्लासेस चालकाची गळफास घेऊन आत्महत्या!

बीड स्पीड न्यूज 


बीडमध्ये नामांकित क्लासेस चालकाची गळफास घेऊन आत्महत्या!


बीड| प्रतिनिधी-: शहरातील ब्राईट स्पर्धा - परीक्षा केंद्राचे संचालक राजाराम धस (वय ४०, रा. नाथसृष्टी, बीड) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन दिवसापूर्वीच त्यांनी क्लासेसचे शाखेचे उद्घाटन केले होते.राजाराम धस हे गेल्या वीस वर्षांपासून खासगी क्लासेस चालवत होते मूळचे केज तालुक्यातील सारणी गावचे राजाराम धस वडील पोलिसांत असल्यामुळे बीड शहरात वास्तव्याला आले. काही वर्षे शहरातील जिज्ञासा करिअर अकॅडमी मध्ये शिक्षक म्हणून काम केल्यानंतर गेल्या आठ वर्षापासून शहरातील अंकुश नगर भागात ते स्वतःच ब्राईट स्पर्धा परीक्षा केंद्र चालवत होते.बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास राजाराम धस यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत जेवण केलं आणि त्यानंतर सर्वजण झोपण्यासाठी आपापल्या खोलीत गेले, मात्र तीन वाजता त्यांचा लहान भाऊ उठला असता एका बंद असलेल्या खोलीचा दरवाजा त्याला उघडा दिसला आणि त्याने आत जाऊन पाहिले असता राजाराम धस यांनी गळफास घेतलेल्याच त्यांच्या निदर्शनास आलं, त्यांनी तात्काळ शिवाजीनगर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिस तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले आणि राजाराम यांचा मृतदेह बीडच्या जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला

आत्महत्येमागचं कारण अस्पष्ट

राजाराम धस यांनी आत्महत्या का केली याचं कारण मात्र अद्याप कळलेलं नाही. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं आणि आई वडील असा त्यांचा परिवार आहे. दोन दिवसांपूर्वीच धस यांनी शहरांमध्ये एका नवीन खासगी क्लासेसच्या शाखेचे उद्घाटन केलं होतं, वीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर त्यांनी स्वतः जागा घेऊन हे क्लासेस उभे केले, मात्र एका रात्रीतच असं काय झालं? की त्यांनी अचानक गळफास घेऊन आत्महत्या केली. पण एका रात्रीतूनच काय घडलं असावं? असा प्रश्न उभा राहिला आहे. राजाराम धस यांनी आत्महत्या केलीय की आणखी काही, याचा तपास पोलीस करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा