Subscribe Us

header ads

बीडचे प्रभारीराज संपवण्यासाठी लोकसेनाने शासनाला केली होती मागणी पूर्णवेळ पोलिस अधीक्षकांची नियुक्ति

बीड स्पीड न्यूज 


बीडचे प्रभारीराज संपवण्यासाठी लोकसेनाने शासनाला केली होती मागणी पूर्णवेळ पोलिस अधीक्षकांची नियुक्ति 

बीड प्रतिनिधी: आर. राजास्वामी यांच्या बदलीनंतर तब्बल एक महिना बीडमध्ये प्रभारीराज सुरु होते यामुळे जिल्ह्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट सुरु झाला होता यासाठी लोकसेना संघटना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी शासनाला निवेदनाद्वारे मागणी केली होती की बीडला अतिरिक्त किंवा प्रभारी पोलिस अधीक्षक न देता कायमस्वरूपी पूर्णवेळ एस. पी. दया म्हणून शासनाने लोकसेना संघटनेच्या मागणीला मान देवून अखेर बीड जिल्ह्याला पूर्णवेळ पोलिस अधिक्षक म्हणून नांदेड येथील नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची नियुक्ती केली आहे. आता बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून नंदकुमार ठाकूर हे कामकाज पाहणार आहेत जिल्हावासियान्सह लोकसेना संघटना नवीन एस. पी. साहेबांचे स्वागत करत आहे. बीडमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांसह अवैध धंदे रोखणे नंदकुमार ठाकूर यांच्यासमोर मोठे आव्हाण असतील पण ते यामध्ये यशस्वी होतील अशी अपेक्षा जिल्हा वासियान्ना त्यांच्याकडून आहे व शासनाने नवीन पूर्णवेळ एस. पी. दिल्याने लोकसेना संघटनेच्या मागणीला यश म्हणता येईल लोकसेना संघटना शासनाचे आभार व्यक्त करत आहे अशी माहिती लोकसेना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी प्रसिद्धि माध्यमाद्वारे केली आहे.

                              

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा