Subscribe Us

header ads

धर्मनिरपेक्षतेचा दिखावा करणाऱ्या पक्षाचा बुरखा फाड़ण्यासाठी लोकसेना नगरपालिका मैदानात उतरणार उमेदवारांच्या मुलाक़ाती घेणार -- जिल्हाध्यक्ष सुफियान मणियार

बीड स्पीड न्यूज 


धर्मनिरपेक्षतेचा दिखावा करणाऱ्या पक्षाचा बुरखा फाड़ण्यासाठी लोकसेना नगरपालिका मैदानात उतरणार उमेदवारांच्या मुलाक़ाती घेणार -- जिल्हाध्यक्ष सुफियान मणियार

बीड प्रतिनिधि: लोकसेना संघटनेची महत्वाची बैठक ॲड. प्रा. इलियास इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष कार्यालयात घेण्यात आली या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की आगामी नगरपालिका निवडणूका लोकसेना संघटना स्वबळावर लढ़णार, कोणी इतर पक्ष-संघटना स्वतः हुन विकासाच्या मुद्दयावर युती-आघाडी करण्यासाठी निमंत्रण देत असेल तर विचार करू कारण आमचा सुरुवातीपासून विरोध घराणेशाही व गुलामीला आहे आणि जे पक्ष-नेते स्वतः ला धर्मनिरपेक्ष म्हणून मिरवतात  व जातीयवादी पक्षान्ना छुपी मदत करतात  अशा पक्ष-संघटनेचा लोकसेना पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही. कारण कांग्रेस-राष्ट्रवादी सारख्या पक्षातील नेत्यांनी धर्मनिरपेक्षतेचे कपडे जरी परिधान केले असले तरी त्यांची चड्डी-बनियान ही सेना-भाजपा आर एस एस सारख्या जातीयवादी पक्षाची आहे हे विसरता कामा नये आपण अनेक वेळा अनुभवलेले आहे. म्हणून येणाऱ्या शनिवार व रविवार दि. सोळाह व सतरा जुलाईला पक्ष कार्यालयात दुपारी एक ते पाच वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांच्या मुलाक़ाती घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी याची नोंद घ्यावी मुलाक़ाती फॉर्म मुलाक़ाती वेळेस ऑफिसवर मिळेल तरी पुढील संपर्क करण्यासाठी या दूरध्वनीवर फ़ोन करावे जिल्हाध्यक्ष सुफियान मणियार 8080366193, शहराध्यक्ष शेख अयाज़ अखतर 9975915787, तालुकाध्यक्ष अतीख अहमद खान 9767335898 या बैठकीला लोकसेना संघटना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार, खैसर बेग उर्फ़ मामू, सुफिया मणियार, वकील संघाचे ॲड. कलीम काज़ी, अतीख अहमद खान, शेख अयाज़, शेख समीर, अकबर अतार, आरीफ शेख, सालेम भैय्या, वजीर काज़ी,आबेद हुसेन रज़ी भैय्या, इत्यादि उपस्थित होते सर्वांचे आभार अयाज़ अखतर यांनी मानले.

                                    
                        
                              
        

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा