Subscribe Us

header ads

थक्कीत वेतना साठी मुख्याधिकाऱ्यां चे पत्र ठरले 'लबाडाचे आमंत्रण‌.,! कामगारांचे उपोषण सुरु.

बीड स्पीड न्यूज 


थक्कीत वेतना साठी मुख्याधिकाऱ्यां चे पत्र ठरले 'लबाडाचे आमंत्रण‌.,! कामगारांचे उपोषण सुरु.

माजलगाव (प्रतिनिधी): येथील नगरपरिषदेच्या सफाई विभागातील कामगारांचे वेतन संबंधित निविदा धारकाने गेल्या तीन महिण्यां पासून थक्कीत ठेवल्यामुळे ते देण्यात यावे मागणी करीता सामायिक कार्यकर्ते अनिल साळवे यांच्या नेतृत्वाखाली २०कामगारांनी २७जून रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. यावर मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या कडून थक्कीत वेतन ८दिवसात अदा करण्याचे लेखी आश्वासन दिले होते पण १५दिवस झाले पण दमडाहि दिला आहे त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन म्हणजे "लबाडाचे आमंत्रण." ठरल्याचे स्षट झाले आहे.कारण २७जून ला दिलेल्या लेखी आश्वासनात नमुद करण्यात आले होते की, स्वच्छता निविदा धारकाला ८दिवसात वेतन देण्यास सांगितले असुन त्याने नाही दिले तर नगरपरिषदे कडून कार्यालयालयीन प्रक्रिया पूर्ण करुन न.प.कडून वेतन अदा करण्यात येईल. ‌पण १०दिवस प्रतिक्षा करुनही कामगारांचे वेतन देण्यात आले नाही त्यामुळे अनिल साळवे यांनी पुनः ७जुलै रोजी मुख्याधिकाऱ्यां ना निवेदन दिले होते आणि १२जुलै पर्यंत वेतन अदा केले नाही तर १३जुलै बुधवार रोजी मुख्याधिकाऱ्यां च्या दालना समोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. निवेदन, इशारा, आंदोलनाची सहजासहजी दखल घेतील ते भोसले कसे. म्हणुन परिणामी अनिल साळवे यांच्या नेतृत्वाखाली २०कामगारांनी १३जुलै बुधवार रोजी पासून मुख्याधिकारी विशाल भोसलेंच्या दालना समोर उपोषण सुरू केले आहे. यात शिल्पाबाई शिनगारे, धम्मशिला वारकड,वैजंताबाई डोंगरे, सुनिता उफाडे,कविता काळे,गौराबाई गायकवाड, लताबाई गायकवाड, कमलबाई फुलवरे ,सविताबाई फुलवरे,ललिताबाई फुलवरे,द्वारकाबाई भिसे,इंदूबाई वाघमारे या महिला कामगारां सह प्रकाश आवाड,राजेंद्र उफाडे, प्रदिप भिसे, नवनाथ लोखंडे, विकास अवचार या पुरुष कामगारांचा समावेश आहे. कार्यालयालयीन वेळ संपली त्यानंतर हि मुख्याधिकारी भोसले यांनी उपोषणाची काहिच दखल घेतली नाही नव्हे तर ते कार्यालया कडे फिरकले पण नाहीत त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांचा निगरगट्ट पणा यावरुन लक्षात येईलच परंतु जोपर्यंत नगदी रक्कम देण्यात आली नाही किंवा त्यांच्या खात्यात जमा करत नाहीत तो पर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निश्चय कामगारांनी केला असल्याचे अनिल साळवे यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा