Subscribe Us

header ads

भर पावसातही प्रतिसाद कायमच!न.प. निवडणुकीच्या उमेदवारीसाठी दुसर्‍या दिवशीही इच्छुक मोठ्या संख्येने उपस्थित

बीड स्पीड न्यूज 


भर पावसातही प्रतिसाद कायमच!

न.प. निवडणुकीच्या उमेदवारीसाठी दुसर्‍या दिवशीही इच्छुक मोठ्या संख्येने उपस्थित

बीड दि.१३(प्रतिनिधी):- बीड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आ.संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाची तयारी सुरू 

आहे.इच्छुक उमेदवारांच्या सोमवार (दि.१२) पासून मुलाखती घेणे सुरू असून दुसऱ्या दिवशीही (दि.१३) पडत्या पावसात देखील अनेकांनी मुलाखती देऊन 

आपला उत्साह दर्शविला.गेल्या दोन-तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यासह शहरात जोरदार पाऊस सुरू आहे‌.यातच नगरपरिषदेच्या निवडणुकांच्या हालचाली सुरु आहेत.बीड 

नगरपरिषदेसाठी आ.संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली नियोजनात्मक कामे सुरू आहेत.दरम्यान मंगळवार (दि.११) पासून गुरूवार (दि.१४) पर्यंत 

शहरातील राष्ट्रवादी भवन याठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या वेगवेगळ्या प्रभागांच्या तीन टप्प्यात तीन दिवस मुलाखती ठरविण्यात आल्या आहेत.पहिल्या 

आणि दुसर्‍या दिवशीही इच्छुकांनी पडत्या पावसात मुलाखतीस उपस्थित राहून आपला प्रचंड उत्साह दाखविला आहे.दुसर्‍या दिवशी म्हणजेच बुधवार (दि.१३) रोजी प्रभाग क्रमांक २,६,७,८,१६,१७,१८ या 

प्रभागातील उमेदवारीसाठी मुलाखती पार पडल्या.तर आज प्रभाग क्रमांक १,९,१०,११,१२,१३,१४,१५,२६ येथील मुलाखती होणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा