Subscribe Us

header ads

चिकलठाणा (बु.) सर्कलमध्ये मा. श्री. आबासाहेब टरपले यांना भाजपने जिल्हा परिषद सदस्यसाठी उमेदवारी देण्यात यावी...!

बीड स्पीड न्यूज 



सातोना/पांडूरंग शिंदे

चिकलठाणा (बु.) सर्कलमध्ये मा. श्री. आबासाहेब टरपले यांना भाजपने जिल्हा परिषद सदस्यसाठी उमेदवारी देण्यात यावी...!

         


सेलू -: सेलू तालुक्यातील एकूण सहा जिल्हा परिषद सर्कलपैकी चिकलठाणा बु. हे सर्कल नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) प्रवर्गासाठी राखीव जागा सुटले आहे. मागील निवडणुकीत पक्षाची राजकीय पार्श्वभूमी जिकिरीची असतांना सुध्दा भारतीय जनता पक्षाचे अधिकृत तिकिटावर आबासाहेब टरपले यांनी पंचायत समितीचे खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवून तब्बल दिड हजार जवळपास मतदान घेऊन पक्षाची राजकीय विचारधारा सामान्य जनतेत पोहचवत खंभिर लढत दिली होती.  पक्ष वाढवण्यासाठी अतिशय मेहनत घेऊन वेळोवेळी पक्षाचे कार्यक्रम राबवणारे तसेच पक्षासाठी नेहमी प्रयत्नशील असणारे व्यक्तिमत्व, प्रसिध्द उद्योजक व महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार निर्माण करून दिला आहे. बेरोजगार  तरूणांना रोजगार देणारे आबासाहेब टरपले यांना जिल्हा परिषद सदस्य साठी चिकलठाणा सर्कल मधून ओबीसी प्रवर्गातून संधी दिल्यास नक्कीच आबासाहेब पक्ष वाढवण्यासाठी व सामन्याना न्याय मिळवून देण्यासाठी योग्य ती दिशा देतील. अशी अपेक्षा सामान्य मतदारांतून व्यक्त होत आहे. अनेक मतदार सामान्य व्यक्ती, शेतमजूर, शेतकरी, अनेकांनी आबासाहेब टरपले यांच्याकडे आपण जिल्हा परिषद सदस्य साठी चिकलठाणा सर्कल मधून ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. तरी पक्षाने संधी दिल्यास ते नक्कीच संधीच सोनं करतील अशी जनतेची अपेक्षा आहे. या राखीव जागेवर पक्षाने संधी दिल्यास निवडणुका लढवण्यास आबासाहेब टरपले हे स्वतः सुध्दा इच्छुक असून पक्षाने संधी दिल्यास नक्कीच निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं समजलं आहे. संधीच सोनं करून दाखवू व पक्षासाठी व जनतेसाठी नेहमी काम करत राहू असे प्रतिपादन आबासाहेब यांनी केले.परभणी जिल्ह्याचे नेते मा. आ. रामप्रसादजी बोर्डीकर साहेब व जिंतूर सेलू विधानसभेच्या लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार सौ. मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांचे कट्टर समर्थक असलेले आबासाहेब टरपले हे सामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तिमत्व असून त्यांना उमेदवारी दिल्यास शांत, संयमी, उद्योजक, सुशिक्षित व्यक्तिमत्व म्हणून अतिशय योग्य उमेदवार राहतील यात शंका नाही. आदरणीय आमदार सौ मेघना दिदी बोर्डीकर यांच्या वाढदिवस नाशिक शहरात साजरा व्हावा ही इच्छा व्यक्त करत वाढदिवसा निमित्त त्यांनी त्र्यंबकेश्वर येथील अनाथ आश्रमामध्ये मुलांना जिवन आवश्यक वस्तूचे किट वाटप केले होते, तसेच पक्षाच्या विविध कामांमध्ये सक्रिय सहभागी होणारे तसेच सामाजिक कार्यात सुध्दा नेहमी अग्रेसर भूमिका बजावणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहिले जाते. एक संघर्षमय चेहरा असलेले आबासाहेब टरपले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन  जनसामान्यांसाठी काम करणारे तसेच देशाचे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंढे साहेब, देशाचे नेते नरेंद्रजी मोदी साहेब यांची विचारधारा व पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ विकासजी महात्मे साहेब तसेच मा,आमदार नरेंद्र पवार (कल्याण विधानसभा ) यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणारे एक धुरंधर व सक्षम कार्यकर्ता म्हणून आबासाहेब टरपले यांची संपुर्ण महाराष्ट्रभर परिचित असून पक्षासाठी नेहमी प्रयत्नशील व धडपडणारे व्यक्तिमत्व म्हणून आबासाहेब टरपले यांची ओळख सामान्य व्यक्तिंपासून ते राज्यभरातील सर्व नेत्यांसोबत आबासाहेब यांची नाळ जुळलेली आहे. सामान्य लोकांच्या मनातील विचार नक्कीच सत्यात साकारता येईल. आदरणीय आमदार सौ मेघना दिदी बोर्डीकर यांचे कार्याचे गौरवशाली विचार राज्यातील महत्वाचे शहर मानल्या जाणाऱ्या नाशिक शहरात पोहचवण्यासाठी आबासाहेब टरपले यांची भूमिका अतिशय महत्त्वाकांक्षी व चांगली मानली जाते.आबासाहेब सामान्य जनतेची इच्छा असलेले सामन्यातील असामान्य कार्यकर्ता आबासाहेब टरपले* यांना निश्चितच जिंतूर सेलू विधानसभेच्या लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार सौ मेघना दिदी बोर्डीकर उमेदवारीची संधी देऊन सन्मान करतील व त्यांना निवडून आणण्यास प्रयत्न करतील अशी जनतेची अपेक्षा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा