Subscribe Us

header ads

माजलगाव नप मध्ये माहिती अधिकार देण्यात टाळाटाळ, स्वच्छता अभियंता करतो अरेरावीची भाषा-शेख रशिद

बीड स्पीड न्यूज 


माजलगाव नप मध्ये माहिती अधिकार देण्यात टाळाटाळ, स्वच्छता अभियंता करतो अरेरावीची भाषा-शेख रशिद

माजलगाव- माजलगाव नगरपरिषद काहिना काही कारणांमुळे चर्चेत असते येथील अधिकारी,कर्मचारी आमचा काहिही होऊ शकत नाही जेव्हा मन येईल तेव्हा काम करु अश्या प्रकारचे दादागिरी करत आहेत.माहिती अधिकार कायदा अंतर्गत माहिती मागितली असता टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करत आहे मला जेव्हा टाईम भेटल तेव्हा देवु अश्याप्रकारची भाषा करत आहेत अश्या प्रकारची दादागिरी खपवून घेणार नाही असा संतप्त प्रतिक्रिया एम आय एम चे शहराध्यक्ष शेख रशिद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.माजलगाव नगरपरिषद मध्ये 18/7/2022 रोजी स्वच्छते व पाणीपुरवठा टेंडर ची माहिती अधिकार कायदा अंतर्गत माहिती मागितली होती पण एक ते दीड महिना झाला आहे तरी स्वच्छता अभियंता याने माहिती दिलेली नाही कित्येकदा बोलुन हि माहिती देण्यात टाळाटाळ करीत आहेत. नाही तर मला टाईम भेटल तेव्हा देवु नसता काय करायची करा अश्या प्रकारची दादागिरी करत आहेत. ह्याविषयी नगरविकास मंत्री, आयुक्त, जिल्हाधिकारी यांना तक्रार दाखल करणार अशी माहिती एम आय एम चे शहराध्यक्ष शेख रशिद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा