Subscribe Us

header ads

एकुरका येथे विहिरीत बुडून बापू लेकांचा दुर्दैवी मृत्यू

बीड स्पीड न्यूज 


एकुरका येथे विहिरीत बुडून बापू लेकांचा दुर्दैवी मृत्यू 


केज -:  तालुक्यातील एकुरका येथे विहिरीत बुडून बापू लेकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली रोहन नटराज धस आणि नटराज रामहरी धस अशी मृतांची नावे आहे. तालुक्यातील एकुरका येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथीच्या वर्गात शिकत असलेला  सोनू उर्फ रोहन नटराज धस (वय १३ वर्षे ) आज शाळा सुटल्यानंतर वडील नटराज राम हरीधस (वय ३३ वर्षे ) यांच्यासोबत शेतात गेला होता. रोहन शेतातील विहिरीत पाणी पिण्यासाठी उतरला असता पाय घसरून पाण्यात पडला. हे पाहताच नटराज यांनी विहिरीत उडी घेत रोहनला वाचवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र  रोहनने  वडिलांच्या गळ्याला मिठी मारल्याने ते दोघेही बुडाले. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशानुसार नांदुर घाट पोलीस चौकीचे मेसे आणि रशीद शेख यांनी घटनास्थळी धाव घेऊन उत्तरीय तपासणीसाठी दोन्ही मृतदेह नांदुर घाट येथील ग्रामीण येथे हलविले आहे.बाप लेकांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा