Subscribe Us

header ads

आजाराला कंटाळून ५५ वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

बीड स्पीड न्यूज 


प्रतिनिधी नवनाथ गोरे

आजाराला कंटाळून ५५ वर्षीय इसमाची गळफास घेऊन   आत्महत्या



वाकनाथपुर | प्रतिनिधी-: बीड जिल्ह्यातील आत्महत्या काही केल्या थांबत नाहीत रोज कोठे ना कोठे आत्महत्या होत आहेत. आज सकाळी बीड पासुन जवळच असणाऱ्या अंतरवन पिंपरी येथे एका ५५ वर्षीय पुरुषाने आत्महत्या केली परमेश्वर धोंडीराम हिंगनिरे (वय ५५ वर्ष राहणार अंतरवण पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. परमेश्वर हे काही महिन्यांपासून आजारी होते दवाखान्यात जाऊन देखील काही फरक पडत नसल्याने या आजारामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून परमेश्वर यांनी आज दिनांक १२ सप्टेंबर वार सोमवार रोजी सकाळी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार अशोक दराडे आणि पो.अमालदार दिलीप सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि प्रेत बीड येथे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली  पुढील तपास पिंपळनेर पोलीस हे करत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा