Subscribe Us

header ads

विद्यार्थ्यांनी परिश्रमासोबत सामाजिक भान ही ठेवणे गरजेचे---- ज्योतीताई विनायकराव मेटे

बीड स्पीड न्यूज 


विद्यार्थ्यांनी परिश्रमासोबत सामाजिक भान ही ठेवणे गरजेचे---- ज्योतीताई विनायकराव मेटे


बीड | प्रतिनिधी -: असोसिएशन ऑफ मायनॉरिटी एज्युकेशन सोसायटी बीड व जय हिंद एज्युकेशन कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नीट परीक्षा 2022 मध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा जयहिंद एज्युकेशन कॅम्पस,मिल्लत नगर बीड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. या प्रसंगी बोलताना श्रीमती ज्योतीताई यांनी असे म्हटले की विद्यार्थ्यांनी आपल्या कठोर मेहनतीच्या बळावर अभ्यास करून या परीक्षेमध्ये उत्तुंग असे यश प्राप्त केलेले असून सदरील यशाला जास्त हुरळून न जाता पुढील भावी आयुष्यात अशीच कठोर मेहनत व परिश्रम घेऊन एक 

उत्कृष्ट नागरिक बनण्यासाठी प्रयत्न करावेत व सोबत आपल्या पालक आपल्यासाठी जी काय मेहनत घेतलेली आहे याची जाण ठेवावी व समाजाचे आपण काही देणे लागत आहे या भावनेने सामाजिक भान ही ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे असे प्रतिपादन केले याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना बहुमूल्य असे भावी आयुष्यात उपयोगी पडेल असे मार्गदर्शन केले तसेच मोइन मास्टर सहाब, पोलीस निरीक्षक कोकणे साहेब,माॅ जिजाऊ चे आप्पासाहेब शिंदे,साईनाथ परभणे,मुश्ताक अन्सारी,डॉक्टर शेख फेरोज यांनी मार्गदर्शन केले
सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक असोसिएशन ऑफ माय 

नोटीस एज्युकेशन सोसायटी बीड, चे अध्यक्ष शेख निजाम जैनुद्दीन यांनी केले सदरील प्रस्ताविकामध्ये त्यांनी असोसिएशनने आजपर्यंत केलेल्या कामांची माहिती आलेल्या मान्यवरां समोर मांडली व भविष्यात पुढे असोसिएशन मार्फत यासारखे चांगले उपक्रम घेण्यात येतील असे म्हटले सदरील कार्यक्रमात एकूण 27 विद्यार्थ्यांचा माननीय ज्योतीताई मेटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सदरील कार्यक्रमात असोसिएशन ऑफ मायनॉटी एज्युकेशन सोसायटीचे सचिव मुश्ताक अन्सारी सहसचिव असलम अनवरी कोषाध्यक्ष अब्दुल वकील सर रामहरी मेटे, शेख बाबु सेठ, मनोज जाधव, बप्पा साहेब घुगे, पांडुरंग आवारे , शेषराव तांबे, गणेश धोंगडे,प्रा.जावेद पाशा,डॉक्टर शेख फिरोज,अनिल घुमरे, खयुम इनामदार, शेख खदिर, मोमीन जुबैर,जयंत वाघ,किरण देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा