Subscribe Us

header ads

पत्रकार विशाल सराफ यांचे उपोषण लेखी आश्वासनानंतर स्थगित

बीड स्पीड न्यूज 


पत्रकार विशाल सराफ यांचे उपोषण लेखी आश्वासनानंतर स्थगित

धारूर। प्रतिनिधी: धारूर तालुक्यातील गोपाळपूर ग्रामपंचायत अंतर्गत संभाजीनगर, वडारवाडी, शिक्षक कॉलनी या ठिकाणी करण्यात आलेल्या विकास कामांची माहिती देण्यात यावी यासाठी येथील पत्रकार विशाल सराफ यांनी उपोषण सुरू केले होते.या उपोषणाला ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, सरपंच उपसरपंच, गटविकास अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले आहे. धारूर तालुक्यातील गोपाळपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या संभाजीनगर, वडारवाडी शिक्षक कॉलनी या ठिकाणी करण्यात आलेल्या विकास कामांची सविस्तर माहिती देण्यात यावी यासाठी पाच ऑगस्ट रोजी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार विशाल सराफ यांनी निवेदन दिले होते. परंतु तरीदेखील प्रशासनाने त्यांना हवी असलेली माहिती दिली नाही. यामुळे त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमरण उपोषण सुरू केले होते. हवी असलेली माहिती सोमावरी देण्यात येईल या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले आहे. यावेळी पत्रकार बांधव ग्रामविकास अधिकारी, गटविकास अधिकारी, शिंदे गट शिवसेना तालुका अध्यक्ष बाळासाहेब कुरुंद, गणेश पवार, बाबा सराफ, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा