Subscribe Us

header ads

प्रश्न अनेक आहेत शेतकरी दादांनो पण, आत्महत्या करणे हे त्या प्रश्नाचे उत्तर नाही...

बीड स्पीड न्यूज 


प्रश्न अनेक आहेत शेतकरी दादांनो पण, आत्महत्या करणे हे त्या प्रश्नाचे उत्तर नाही...




        


बीड | प्रतिनिधी-: आजच्या धावत्या युगात जगाला जगवणारा पोशिंदा काळाच्या पडद्याआड चालला आहे. स्वतः स्वतःचे जीवन संपून जगाचा निरोप घेत आहे. म्हणूनच उभ्यासृष्टीला जो जगवतो तो जगवला पाहिजे. आत्महत्या करण्याचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. गेल्या नऊ महिन्यांत दीड हजार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. पश्चिम विदर्भात 817 मराठवाड्यात 661 शेतकरी आत्महत्येची नोंद झाली आहे. म्हणजेच सरासरी दिवसाला तीन शेतकरी आत्महत्या करीत आहे. कधी नापिकी, कधी अतिवृष्टी कधी दुष्काळ तर कधी रोग आणि घातक किडींचा प्रादुर्भाव यातूनच होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी हे पाऊल उचलत आहे. म्हणजेच गरीब हा गरीबच राहिला आणि श्रीमंत आपले खिसे भरत राहिले . घेतलेले कर्ज परत न करता आल्याने शेतकरी आणखीनच खचून गेला आहे. पेरलेले जर उगवतच नाहीत त्यात कर्जाचा डोंगर परत दुबार पेरणीचा खर्च आणि मग उचलले जाते ते निराशा जनक जीवन संपवण्याचे पाऊल  ........पण या सर्व गोष्टीवर आत्महत्या  करणे हेच त्याचे उत्तर नाही माझ्या प्रिय शेतकरी दादांनो  परिस्थितीवर मात करून परत उमेदीने उभे राहणे खूप महत्त्वाचे आहे.
   "नको लावूस फास गळा बळीराजा,
   तूच आहेस या भारत  देशाचा खरा पोशिंदा 
आत्महत्येचे जास्त प्रमाण कोरडवाहू क्षेत्रात आहे . पावसावर अवलंबून असणारी शेती करणे म्हणजे लाखाचे बारा हजार करण्याचा धंदा असल्यासारखे आहे . पेरणी, कापणी ,मळणी ते विक्री पर्यंत बाजार मांडला गेला आहे. भेसळ ही सढळ हाताने केली जाते . बियाणे नीट उगवत नाहीत, औषधे कीटकांचा जीव घेऊ शकत नाही ,रासायनिक खते जीवनसत्वे देऊ शकत नाही. अशा या बनावट फेऱ्यात शेतकऱ्यांना आणून सोडून देण्यात आले आहे. शेती करणाऱ्यांपेक्षा बियाणे खते कीटकनाशके तयार करणाऱ्यांचा धंदा जास्त सध्याच्या वर्तमान असणाऱ्या या काळामध्ये जोमात चालू आहे. अन्नधान्याच्या बाबतीत आपला हा भारत देश आत्मनिर्भर झाला आहे पण शेतकरी परावलंबी झाला. कर्जमाफी ,अनुदान ,नुकसान भरपाई या सर्व मलमपट्टी आहेत त्यांनी आजारही बरा होत नाही आणि रुग्ण पण दुरुस्त  होत नाही. धड जगु ही द्यायचे नाही आणि मरूही द्यायचे नाही अशा कठीण परिस्थिती शेतकरी अडकला आहे. हे सर्व रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने उद्योग कता निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे . शेतीला पूरक उद्योग सुरू करणे . दुग्ध व्यवसाय, रेशीम उद्योग ,कुक्कुटपालन असे  जोड व्यवसाय शेतकऱ्यांनी सुरू केले पाहिजे. चार बाजूंनी पैसा येईल व तो हातामध्ये खेळता राहील असा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला पाहिजे. आधी शेतकरी सहा महिने मेहनत करतो आणि नंतर पैशासाठी वंचित राहतो हेच तर खरं जास्ती दुर्दैव शेतकऱ्यांचे आहे म्हणूनच स्वतःच्या मालाची किंमत करण्याचा शेतकऱ्याला अधिकार मिळाला पाहिजे. सरकार जे गाई, बकरी, अन्य गोष्टींसाठी अनुदान देते त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यायला हवा. पण सर्वात आधी त्या सरकारी योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे अत्यंत खूप महत्त्वाचे आहे. हे काम सध्याच्या तरुण पिढीने नक्कीच करायला हवे.महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यानी शेती पीक पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. जे विकेल तेच पिकवले पाहिजे उत्कृष्ट अभ्यासपूर्वक  शेती करणे आणि शेतीचे नियोजन ही खूप महत्त्वाचे आहे. जे उपलब्ध आहे त्याचा वापर करून शाश्वत शेती करण्याकडे जास्त भर दिला पाहिजे. आरोग्य संपन्न सेंद्रिय शेती करून आपला उदरनिर्वाह करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. सुधारित शेती करणे हे देखील आजच्या काळाची गरज आहे. मनुष्यबळाचा वापर कमी करून फायद्याची शेती करणे अत्यंत गरजेचे आहे. आणि कमी खर्च पाहिजे तिथे कष्ट आणि जास्त नफा हे धोरण अवलंबले पाहिजे. या सर्व उपाययोजना करून काही प्रमाणात सुख-समृद्धी येऊन आपला हा अखंड भारत देश सुजलाम सुफलाम होऊन आत्महत्येचे प्रमाण कमी होईल. अशी अपेक्षा आहे...

 लेखिका कुमारी मुंजाळ काजल. कैलास. आदित्य  महाविद्यालय  अग्रिकल्चर कॉलेज बीड..

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा