Subscribe Us

header ads

नाथ शिक्षण संस्थेचे सह सचिव प्रदीप खाडे, यांच्याकडून ओझा कुटुंबियांचे सांत्वन

बीड स्पीड न्यूज 


नाथ शिक्षण संस्थेचे सह सचिव प्रदीप खाडे, यांच्याकडून ओझा कुटुंबियांचे सांत्वन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  - शहरातील हालगे गल्ली येथील सत्यभामाबाई जगन्नथजी ओझा यांच्या दुःखद निधन झाले होते. यांच्या दुःखद निधनाबद्दल नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे, यांनी परळी येथील निवासस्थानी जावुन ओझा कुटुंबियांची भेट घेवुन सांत्वन केले. तसेच कै.सत्यभामाबाई ओझा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.परळी शहरातील वैद्यनाथ बँकच्या हालगे गल्ली, परळी वैजनाथ येथील सत्यभामाबाई जगन्नथजी ओझा यांचे बुधवार, दि.05 ऑक्टोबर रोजी दुपारी  वयाच्या 95 वर्षी दुःखद निधन झाले होते. आपल्या मनमोकळ्या स्वभावामुळे  सत्यभामाबाई जगन्नथजी ओझा त्या सर्वांच्या परिचयाचे होत्या. रविवार, दि.09 ऑक्टोबर रोजी नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे यांनी ओझा  कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी नाथ शिक्षण संस्थेचे सचिव प्रदीप खाडे, प्राचार्य अतुल दुबे,मुख्याध्यापक अंबादास लोणीकर सर, बजाज टीचर, भगिरथ ओझा व इतर उपस्थित होते.वैजनाथ जगन्नथजी ओझा, हनुमान जगन्नथजी ओझा, राम जगन्नथजी ओझा(शारदा विद्या मंदिर सहशिक्षक ), श्याम जगन्नथजी ओझा व ओझा कुटुंबिय उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा