Subscribe Us

header ads

इक़बाल टीपू आज़ाद यांच्यावर घेण्यात येणाऱ्या निबंध स्पर्धेत सर्वांनी सहभाग घ्यावा-- काज़ी मुशाहेद सर

बीड स्पीड न्यूज 


इक़बाल टीपू आज़ाद यांच्यावर घेण्यात येणाऱ्या निबंध स्पर्धेत सर्वांनी सहभाग घ्यावा-- काज़ी मुशाहेद सर 


बीड प्रतिनिधि: देशातील स्वतंत्रता सेनानी व राष्ट्रपुरुषांचे कार्य व बलिदान समाजाला माहिती व्हावे म्हणून ज़शने यौमे पैदाइश इक़बाल टीपू आज़ाद स्वर्ण महोत्सव साजरा होत आहे या तिन्ही महान स्वतंत्रता सेनानी यांच्या जयंती निमित्त लोकसेना संघटना व शहीद टीपू सुलतान उत्सव समितीच्या वतीने इक़बाल टीपू आज़ाद महोत्सव विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाद्वारे साजरा होत आहे याचाच एक भाग म्हणून निबंध स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे खाली दिलेल्या एकूण तीन विषयापैकी कोणत्याही एका विषयावर कमीत कमी 100 जास्तीत जास्त कितीही ओळीत मराठी उर्दू हिंदी इंग्रजी भाषेत सुवाच्य व सुंदर अक्षरात निबंध लिहा यास्पर्धेत भाग घेणाऱ्यांना प्रथम दुत्तीय व तृत्तीय बक्षीस तेरा तारखेला सायं. सहा वाजता होणाऱ्या कॉन्फ्रेंस मध्ये मान्यवरांच्या हस्ते दिले जाईल. या स्पर्धेत वय व शिक्षणाची अट नाही दहा वर्षावरील मुले मुली युवा युवती महिला पुरुष विद्यार्थी कर्मचारी कोणत्याही क्षेत्रात काम करणारा आम नागरिक सहभाग घेवू शकताे.

निबंधाचे प्रश्न खालील प्रमाणे 

1) डॉ अल्लामा इक़बाल यांच्यावर निबंध लिहा किंवा
2) शहीद ए आज़म टीपू सुल्तान यांच्यावर निबंध लिहा किंवा
3) भारतरत्न मौलाना अबुल कलाम आज़ाद यांच्यावर निबंध लिहा
       निबंध लिहून त्याची प्रत आज पासून ते दिनांक बारा नोव्हेम्बरच्या दुपारी 2 वाजेपर्यंत मिल्लिया कॉलेज ऑडोटोरियम हॉल किल्ला मैदान बीड येथे किंवा निबंध स्पर्धा समितीकड़े संपर्क करुन जमा करावे असे आव्हान निबंध स्पर्धा समितिने केले आहे निबंध स्पर्धा समिती खालील प्रमाणे राहिल.
समिती प्रमुख
काझी मुशाहेद (अध्यक्ष-अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना) संपर्क:8007313786
समिती सदस्य
शेख मुसा (अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी संघटना) संपर्क :9421277948
माजेद सर (जिल्हा अध्यक्ष-महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना) संपर्क :9595731496
हकीम मनियार-(पदवीधर शिक्षक महासंघ) संपर्क :8329572604
मोमिन इसाक सर 
 वरील सर्व समिती सदस्य असून उर्दू निबंध-काझी मुशाहेद, इंग्रजी- माजेद सर,
मोमीन इसाक विषय तज्ञ
मराठी व हिंदी निबंध-शेख मुसा सर व हकीम मनियार सर यांचे कडे द्यावेत.
                               
                           
         

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा