Subscribe Us

header ads

पिंपळगांव दाणी ते मेहेकरी पुल बांधण्यात यावा--- युवराज खटके


आष्टी/प्रतिनिधी_आष्टी तालुक्यातील पिंपळगांव दाणी येथील नागरीक व विद्यार्थी यांची गैरसोय टाळण्यासाठी मेहेकरी नदीवर मोठा पुल बांधण्यात यावा अशी मागणी लोणी गटातील युवा कार्यकर्ते व युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यध्यक्ष.युवराज खटके यांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी,आष्टी तालुक्यातील सर्वात जुने व मोठे धरण म्हणून मेहेकरी धरणाची ओळख आहे.यावर्षी चांगला पाऊस झाल्याने भरून वाहु लागले आहे,सांडव्यावरून पाणी वहात असल्याने मेहेकरी नदी भरुन वहात होते.पिंपळगांव दाणी येथील  विद्यार्थ्यांना मेहेकरी येथे शाळेत यावे लागते.त्यांना एक किलोमीटरवर ऐवजी अगोदर आनंदवाडी  येथे येऊन  कॅनलने मेहेकरी येथे सात किलोमीटर अंतर दूर वरून जावे लागते.तसेच पिंपळगांव दाणी येथील शेकडो   नागरीकांना कडा - आष्टी  येथे  विविध कामांसाठी जावे लागते.सर्व  नागरिकांना दुरवरून म्हणजे पुंडी,धानोरा येथून कडा येथे जावे लागते त्यामुळे शेतकरी आणि  नागरिकांचा जादा वेळ जातो तसेच  गगणाला भिडलेले डिझेल पेट्रोल जादा लागते.अशाप्रकारे आर्थिक  भुरदंड सहन करावा लागत आहे.वेळेचा पैशाचा मोठ्या प्रमाणावर  अपव्यय होतो.हे सर्व टाळण्यासाठी प्रशासनाने मेहेकरी ते पिंपळगांव दाणी दरम्यान असलेल्या मेहेकरी नदीवर मोठा पुल बांधून व एक किलोमीटर डांबरी रस्ता तरून नागरिक,शेतकरी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी अशी मागणी युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यध्यक्ष.युवराज खटके यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा