Subscribe Us

header ads

शेतकर्‍यांना तात्काळ मदत करा, अन्यथा तिव्र आंदोलन करू- फुलचंद कराड फुलचंद कराड यांनी केली पिकांची पाहणी

परळी (प्रतिनिधी): गेल्या काही दिवसांपासुन अतिवृष्टी पावसामुळे शेतकर्‍यांचे आतोनात नुकसान झाले आहे, म्हणुन शेतकर्‍यांना राज्य शासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भगवान सेनेचे सरसेनापती तथा भाजपाचे जेष्ठ नेते व शेतकर्‍यांचे कैवारी फुलचंद कराड यांनी ठिकठिकाणी दिलेल्या भेटीप्रसंगी दिला.परळी विधानसभा मतदार संघातील गावांना फुलचंद कराड 

यांनी भेटी देवुन शेतकर्‍यांच्या पिकांची पाहणी केली. अक्षरक्षा: सोयाबीन, मुग, तुर, कापूस आदी पिके पावसामुळे वाहून गेली आहेत. यामुळे माझा शेतकरी बांधव गेल्या अनेक वर्षापासुन विविध संकटांला तोंड देवून आर्थिक संकटात सापडला आहे. म्हणून राज्य सरकारने तात्काळ पिकांची पाहणी करून त्यांना आर्थिक मदत द्यावी. येत्या आठ दिवसात आर्थिक मदत शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झाली नाही तर आम्ही माझ्या शेतकर्‍यांच्या मदतीसाठी तीव्र आंदोलन करेल, वेळप्रसंगी हातात नांगर घेवून शासनाच्या विरोधात लोकशाही पध्दतीने आंदोलन करू असाही इशारा फुलचंद कराड यांनी दिला. परळी तालुक्यातील लिंबोटा, पांगरी, गाढेपिंपळगाव, नाथ्रा, सेलू, परचुंडी, भिलेगाव, लिंबोटा तांडा आदी गावांना भेटी देवून शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली, शेतकर्‍यांना दिलासा दिला. तसेच शेतकर्‍यांना तात्काळ मदत द्यावी. यावेळी फुलचंद कराड यांच्या समवेत मंचक मुंडे, इंद्रमोहन मुंडे, रत्नहार कराड, केशव कराड, बाबुराव कराड, विलास कराड, राजाभाऊ पांचाळ, अ‍ॅड.बालाजी कराड, प्रशांत कराड, रवि कराड, बिभीषण गित्ते, आत्माराम गित्ते, बाबुराव राठोड, प्रकाश राठोड, माणिक कडभाने, विकास कडभाने, महादेव कडभाने, बाबुराव कडभाने, मारोती कडभाने, प्रकाश राठोड, बबन जाधव, नितीन जाधव, रंगनाथ घुले, बाळासाहेब जाधव, इंद्रजीत मुंडे, दत्तुआबा मुंडे, तलाठी सलीम शेख, तलाठी साबणे यांच्यासह आदी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा