प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶
बीड प्रतिनिधी_शहरातील बीड शहर बेघर निवारा केंद्र मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीजी, लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सर्वात आधी पवार मॅडम , भागवत वैद्य यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालण्यात आला.तर माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन सर व्यवस्थापक आर जी मने , वंजारे , वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी बोलतांना भागवत वैद्य यांनी राष्ट्रपिता गांधीजी, हे फक्त राष्ट्राचे नव्हे तर जागतिक आदर्श आहेत,असे सांगितले, तर गांधी म्हणजे वैचारिक विद्यपीठ असल्याचे सांगितले.
तर पवार मॅडम यांनी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री हे आधुनिक भारताचे जनक होते,जय जवान जय किसान या नाऱ्या मधून ऐतिहासिक क्रांती घडवून आणली,याचा देखील आवर्जून उल्लेख केला. बीड शहर बेघर निवारा केंद्रामध्ये स्वच्छता अभियान ही करण्यात आले त्यानंतर वृक्षारोपणही करण्यात आले.यावेळी, आम्रपाली वाव्हाळकर, प्रेरणा सूर्यवंशी,ऋतुजा सोनवणे,सरवदे मॅडम, बेघर निवारा केंद्र मधील अधिकारी वर्ग व लाभार्थी वर्ग उपस्थित होता, कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. जी. माने यांनी केले तर, सूत्रसंचालन वैद्य सर यांनी केले तर,व आभार प्रदर्शन वंजारे सर यांनी केले.
0 टिप्पण्या