Subscribe Us

header ads

देवस्थान जमिन गैरव्यवहार प्रकरण: उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) नरहरी शेळके, आघाव पाटीलावर गुन्हा दाखल

बीड_आष्टी तालुक्यात असलेल्या चिंचपूर येथील वक्फ जमीन घोटाळा प्रकरणी बडतर्फ करण्यात आलेले अप्पर जिल्हाधिकारी नरहरी शेळके यास स्थानिक गुन्हे शाखेने औरंगाबाद येथून पकडले आहे. उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळांच्या जमिनी बळकावणारांना अधिकाराचा गैरवापर करत मदत नरहरी शेळके व प्रकाश आघाव पाटील या दोघांनी केली.जमिन गैरव्यवहार प्रकरणात नरहरी शेळके, प्रकाश आघाव पाटील यांनी एका दिवसात 25 जजमेंट देण्याचा महापराक्रम या आधिका-यांनी केलेला आहे. याप्रकरणी सामाजिक संघटनांनी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन संघर्ष केला. आता न्यायालयीन लढाई देखील सुरू आहे. चिंचपूर येथील वक्फ बोर्डाच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात नरहरी शेळके यांना उपजिल्हाधिकारी पदावरून बडतर्फ करण्यात आले.उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 205/2021 भादवि कलम 409,467,648,471,120(ब) 34 सह वक्फ अधिनियम 1954 चे कलम 52( अ ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.नरहरी शेळके यास स्थानिक गुन्हे शाखेने औरंगाबाद येथून अटक केली तर दुसरा आरोपी असलेल्या प्रकाश आघाव पाटील याने गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक पूर्व जामीन मिळवला आहे. प्रकाश आघाव यास 13 तारखेपर्यंत दिलासा न्यायालयंन दिला आहे या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस आधिकारी,आष्टी विभाग विजय लगारे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा