Subscribe Us

header ads

शॉर्टसर्किटने १५० एकर ऊस जळून खाक

बीड स्पीड न्यूज 

शॉर्टसर्किटने १५० एकर ऊस जळून खाक

केज_ केज तालुक्यातील सौंदाना गावच्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा बुधवारी पूर्ववत करण्यात आला होता. परंतु वाऱ्यामुळे विद्युत तारांचे घर्षण होऊन शॉर्टसर्किट ने उडालेल्या ठिणगीने तब्बल १५० एकरांवरील ऊस जळून खाक झाला या अग्नितांडवात ३० ते ४० शेतकऱ्यांचा ऊस जळाला यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे गावकऱ्यांनी महावितरणच्या नावाने ‘शिमगा' केला.सौंदाना गावातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा विद्युत पुरवठा थकीत वीज बिल असल्याने खंडित करण्यात आला होता. काही शेतकऱ्यांनी थकबाकी भरल्यानंतर बुधवारी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र, वाऱ्यामुळे विद्युत तारांचे घर्षण होऊन शॉर्टसर्किट ठिणग्या उडाल्या. उसाच्या फडाने पेट घेतल्याने आणि वाऱ्याच्या वेगाने एकामागून एक पेटत गेले वाऱ्याचा वेग इतका होता की, सौंदाना शिवा बघताबघता आगडोंब उसळला. केजहून अग्निशामक दल गाडी मागविण्यापूर्वीच १५० एकर ऊस जळून खाक झाला. आगीने रौद्र रूप धारण करीत सौंदाना-बनसारोळा रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूचा ऊस खाक झाला.या आगीत ३० ते ४० शेतकऱ्यांचा दीडशे एकर ऊस जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत जगन्नाथ नांदुरे, रमेश भिसे, रुक्मिण भिसे, गणेश भिसे, स्वाती भिसे, राजामती भिसे, प्रदीप भिसे, नरसू भिसे, सूर्यकांत नांदुरे, अशोक नांदुरे, रूपाबाई दहिरे, शहाजी भिसे, महादेव चव्हाण, आदी ३० ते ४० शेतकऱ्यांचा १५० एकर ऊस आगीत जळून खाक झाला. उसासोबत ठिबक संचही जळाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.महावितरणने वीज तारा व्यवस्थित न बसविल्याने हे नुकसान  झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा