Subscribe Us

header ads

सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमावत यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांवर वाळूमाफियांचा प्राणघातक हल्ला



बीड स्पीड न्यूज 


सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमावत यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांवर वाळूमाफियांचा प्राणघातक हल्ला


गेवराई_ सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकातील कर्मचारी गेवराई तालुक्यातील खामगाव व सावरगाव येथे गोदावरी नदी पात्रातील अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेले होते. यावेळी वाळू माफियांनी लोडरच्या खोऱ्याने पथकातील दोन कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून इतर कर्मचाऱ्यांनी बाजूला ओढल्याने ते दोघे बालंबाल बचावले.बीड जिल्ह्यात अवैद्य वाळू उपसा करणारे वाळू माफिया मुजोर झाले आहेत. त्यांना कुणाचा धाक राहिलेला नाही. दि. १६ मार्च बुधवार रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशा नुसार गेवराई तालुक्यातील खामगाव व सावरगाव येथुन वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्रातील अवैद्य वाळू उपशावर कारवाही करण्यासाठी पोलीस पथक गेले होते. या पथकातील पोलीस कर्मचारी बालाजी दराडे, राजू वंजारे, महादेव सातपुते, सचिन अहंकारे व विकास चोपने हे खाजगी वाहनाने केज येथून गेवराईकडे गेले होते. तेथे पोलीस पथक पोहोचतच शहागडकडे जाणाऱ्या गोदावरी नदीवरील जुन्या पुलाचे पुर्व बाजुस नदी पात्रात जाऊन पोलीस पथकाने रात्री ८:१० वा. छापा मारला. तेथे एक लाल रंगाचे विना नंबरचे ट्रॅक्टर व त्याला वाळू भरण्यासाठी समोर लावलेले खोऱ्याने एलपी ट्रक क्र. (एम एच-२३/एआर-८८२२) मध्ये वाळु भरत असतांना दिसले. त्यावेळी तेथे तीन इसम उभे होते. पोलीस गाडीच्या खाली उतरुन ट्रक व ट्रॅक्टर जवळ जात असताना; ट्रॅक्टरचे लोडरचे बाजुला उभे असलेल्या दोन इसमा पैकी अंगात पांढरे कपडे व दाढी असलेल्या इसमाने त्याचे जवळ उभे असलेल्या काळे कपडयातील इसमांनी ट्रॅक्टर लोडर वरील ड्रायव्हरला मोठयाने अवाज देऊन सांगीतले की, समोरुन येणारे लोकांचे अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जिवे मार. असे म्हणुन ओरडल्याने ट्रॅक्टर ड्रायव्हरने वाळू भरण्यासाठी असलेले लोडरचे खोरे पोलीसांना जिवे मारण्याचे उद्देशाने बालाजी दराडे व राजू वंजारे यांच्या अंगावर घालुन दोघांना खाली पाडले. त्यावेळी त्यांच्या सोबतचे विकास चोपने, सचिन अहंकारे यांनी त्या दोघांना हाताला धरून बाजुला ओढले. त्यामुळे ते दोघे बचावले. त्या नंतर ट्रॅक्टर लोडर ड्रायव्हरने ट्रॅक्टर लोडर घेवुन नदी पात्राचे बाजुने असेल्या कच्या रस्त्याने काटया कुपाटयाने पळून गेला. तसेच इतर दोन इसम हे नदी पात्राने पळून गेले. त्यावेळी सोबतचे पोलीस यांनी त्यांचा पाठलाग केला; परंतु ते मिळून आले नाहीत. घटनास्थळ वाळुने भरलेला ट्रक क्र. (एम एच-२३ / ए आर- ८८२२) हा मिळुन आला. पंचा समक्ष सदर ट्रकचा कलम १०२ सीआरपीसी प्रमाणे सविस्तर जप्ती पंचनामा करून ताब्यात घेतले. त्यावेळी पोलीस पथकांनी आजुबाजुला पळून गेलेल्या इसमांची व ट्रॅक्टर लोडरचे चालकाचे नाव गावा बाबत माहिती घेतली.याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बालाजी दराडे यांच्या फिर्यादी वरून तीन जणांच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणून जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून भा.दं.वि. ३०७, ३५३, २३२ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा