Subscribe Us

header ads

विद्यार्थ्यांना इतर पुस्तके पीडीएफ स्वरूपात तर शाळांना प्रोजेक्टर , स्मार्ट टिव्ही देण्यात यावेत

बीड स्पीड न्यूज 


विद्यार्थ्यांना इतर पुस्तके पीडीएफ स्वरूपात तर शाळांना प्रोजेक्टर , स्मार्ट टिव्ही देण्यात यावेत

मुख्याध्यापकांच्या शिष्टमंडळाने आ. विक्रम काळे यांना दिलेल्या  निवेदनातून मांडला असंतोष !

बीड (प्रतिनिधी) - शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर पुस्तकांवर कोट्यावधींचा खर्च करण्याऐवजी ही पुस्तके पीडीएफ स्वरूपात द्यावी व शाळांना प्रोजेक्टर व स्मार्ट टिव्ही देण्यात यावीत. अशी मागणी मुख्याध्यापकांच्या शिष्टमंडळाने आ. विक्रम काळे यांना दिलेल्या  निवेदनातून केली असून शासनाच्या धोरणावर असंतोष व्यक्त केला आहे. याविषयी सविस्तर वृत्त असे की, आ. विक्रम काळे यांनी त्यांच्या निधीतून  सुमारे ४५७ शाळांना शैक्षणिक अभ्यासक्रम विरहित इतर पुस्तके वाटप केली. या संदर्भात बीड शहरातील बार्शी रोडवर असलेल्या आशीर्वाद लाॅन्स हॉलमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, माजलगावचे आ. प्रकाश सोळंके, गेवराईचे माजी आ. अमरसिंह पंडित यांच्याशिवाय अनेक शाळांचे मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात मुख्याध्यापकांच्या शिष्टमंडळाने आ. विक्रम काळे यांना ही पुस्तके निदान पीडीएफ स्वरूपात देण्यात आली आणि शाळांना प्रोजेक्टर व स्मार्ट टिव्ही देण्यात आले तर विद्यार्थ्यांना ही पुस्तके वाचनाशिवाय बघून व ऐकून लवकर लक्षात येईल असे म्हटले. निवेदन देताना हज़रत मन्सूर शाह उर्दू हायस्कूल बीडचे  मुख्याध्यापक डॉ. मुहम्मद सफी अन्वरी, हज़रत बालेपीर उर्दू हायस्कूलचे काज़ी रिजवान अहेमद, बिलाल उर्दू हायस्कूल परळीचे शेख सर, खाडे एबी सर, एस.व्ही. रायभान सर, इंदिरा विद्यालय धर्मापूर तालुका आष्टी, जिल्हा परिषद हायस्कूल पाञूड शरीफ तालुका माजलगाव रुधीसरूर विद्यालय आदींची उपस्थिती होती. यावेळी उर्दू शाळांच्या मुख्याध्यापकांनी सर्व पुस्तके मराठीत असल्याची तक्रार केली. उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी काही पुस्तके उर्दूमध्ये असती तर विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरले असते असे म्हटले. परंतु माध्यम मराठी असो की उर्दू , शैक्षणिक अभ्यासक्रमाशिवाय इतर पुस्तके विद्यार्थ्यांना देण्याऐवजी ती पीडीएफ स्वरूपात देण्यात आली तर शासनाचा कोट्यावधींचा महसूल वाचेल याच वाचलेल्या महसुलातून  प्रत्येक शाळेला प्रोजेक्टर व स्मार्ट टीव्ही दिला जाऊ शकतो असे म्हटले. तेव्हा मुख्याध्यापकांच्या शिष्टमंडळाकडून निवेदन स्वीकारताना आमदार विक्रम काळे म्हणाले की, या चांगल्या सूचना आहेत, त्यासाठी प्रयत्न केले जातील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा